पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ हिंदुधर्मशास्त्र. धिकार नाहीं. जर यांतून कोणी बलात्कारानें स्त्रीधन घेईल तर त्यास तें सव्याज द्यावें लागेल; आणि तिच्या संतोषानें घेईल, तर बद्दल मात्र द्यावें लागेल. " ( ३६९. ) नवरा स्त्रीधन घेऊं शकत नाहीं; परंतु दुष्काळ, अवश्य कर्तव्य ध र्मकृत्य, व्याधि दूर होणें, बंधनांतून मुक्त होणें, पुत्राची पिडा दूर होणे, इतक्या गो- ष्टींकरितां नवरा स्त्रीधन घेऊं शकतो; व तें परत देण्याची त्याची इच्छा नसेल तर स्त्रीस परत मिळणार नाहीं.' १८ ( ३७०. ) दोन स्त्रिया आहेत, आणि त्यांतून एकीशीं संगादिक वर्ज्य केलें असेल, तर पूर्वी संतोषानें तिर्णे दिलेले स्त्रीधन नवऱ्याने तिला परत दिले पाहिजे; परंतु जर ती पतिव्रता असेल तर मात्र दिले पाहिजे; आणि व्यभिचारिणी किंवा नवऱ्याचा अ पकार करणारी व भलत्याच रीतीनें द्रव्याची खराबी करणारी अशी असेल, तर तिचें स्त्रीधन नवऱ्याकडून परत मिळणार नाहीं." ( ३७१.) आतां स्त्रीधनाविषयीं जे इनसाफाचे समयीं निरनिराळे ठराव झाले आहेत त्यांत एकाच ठिकाणी वर सांगितलेले स्त्रीधनाचे सर्व प्रकार यांचा एकाच वेळी विचार होऊन ठराव झालेले नाहींत; तरी निरनिराळ्या प्रकरणीं जे ठराव झाले आहेत ते त्या त्या मुद्यांचें स्पष्टीकरण करण्यास उपयोगी आहेत. ( ३७२. ) एका नवऱ्यानें दुसरे लग्न करिते वेळी त्या दुसऱ्या स्त्रीस ८५० रुप- यांचे दागिने दिले; पुढे त्यांचा आपसांत ठराव होऊन, ती अन्नवस्त्र घेण्याचें कबूल करून निराळी राहिली. नंतर तिच्या आंगावर कांहीं दागिने नाहींत असे पाहून तिचा हिशेब घ्यावा, व दागिन्यांबद्दल तिचा जामीन ध्यावा, असा दावा तिजवर नवऱ्याने आ- णिला. तेव्हां असा ठराव झाला कीं, सदरहु स्त्रीधनाची पूर्ण मालकी बायकोची आहे, सबब दावा रद्द केला.” मयूखाप्रमाणे विवाहाच्या वेळीं मिळालेले दागिने फक्त मुलीं- कडे जातात. नंतर नवऱ्याने अथवा इतर नातेवाईकांनी दिलेले मुलगे व मुली यांस मिळतात. २१. ( ३७३. ) एका बायकोने आपल्या नवऱ्यावर फिर्याद केली की लग्नसमयीं मला आईबापांपासून मिळालेले द्रव्य, व दुसरें कांहीं जातीच्या चालीप्रमाणे मिळालेलें १७. व्य. म. भा. भा. २, २०७-८. १८. व्य. म. भा. भा. २ पृ. २०८. १९. व्य. म. भा. भा. २ पृ. २०९. २०. बा. र. वा. २ पृ. ३२१ ता. १८ जून सन १८२२. २१. आशाबाई वि. हाजी तय्यब इं. ला, रि, ९ मुं. ११५ ( हा कज्जा खोजे लोकांतील आहे, परंतु त्याचा निकाल हिंदुधर्मशास्त्राप्रमाणेच होतो.