पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ हिंदुधर्मशास्त्र. प्र० ६ प्रकार असा होता की, एका स्त्रीने आपल्या नवऱ्यावर अन्नवस्त्राचा हुकुमनामा मिळविला. त्यानें अपील केलें. इतक्यांत ती मेली. तेव्हां प्रश्न निघाला कीं, अपिलांत तिच्या ठि- कार्णी तिच्या दोन मुली दाखल करावयाच्या अथवा तिचा नवरा. तेव्हां अर्थात् तिच्या मुलींची नांवें त्या तिच्या वारस ह्मणून दाखल करावी असा ठराव झाला. (३६३.) कन्या, पुत्र, पौत्र, व प्रपौत्र, हे ज्या स्त्रियांचे वारस नसतील, आणि ज्यां- चे विवाह, ब्राह्म, दैव, आर्ष, व प्राजापत्य, या चार विधींनी झाले असतील, त्यांचें पारि- भाषिक स्त्रीधन नवऱ्यास मिळेल, आणि आसूर, गान्धर्व, राक्षस आणि पैशाच या विधींनीं जिचा विवाह झाला असेल, तिचें परिभाषिक स्त्रीधन वर सांगितलेल्या प्रपौत्रपर्यंत सन्त- तीच्या अभावीं, तिच्या आईबापांस मिळेल. त्यांत पहिल्यानें आईस, व नंतर बापास मिळेल. नवऱ्याच्या व आईबापांच्या अभावीं नवऱ्याचे जवळचे संबंधी व आईबापांचे जवळचे संबंधी, यांस पारिभाषिक स्त्रीधन मिळेल. ब्राह्म इत्यादि चार विधींनीं विवा- हित स्त्रीचें धन नवऱ्याच्या अमावीं, मावशी, मामी, चुलती, आते, सासू व वडील मावाची बायको यांस मिळेल. 99 १२ ( ३६ ४.) वर सांगितलेल्या वारसांनी सांगितलेलें स्त्रीधन सामान विभागून घ्यावें, किंवा एकाच्या अभावी एकाने घ्यावे याविषयीं ग्रंथकारांनी स्पष्टपणे सांगितलें नाहीं; तरी संबंधित्वाचा निकटपणा सर्वांवर सारखाच आहे, याकरितां ते समान वांटून घेतील हें ह्मणणे योग्य दिसतें. ( ३६५.) आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच, या चार प्रकारच्या विवाहां- च्या ठायीं स्त्रीस बंधूंनी दिलेले द्रव्य तिच्या मरणानंतर पहिल्यानें भावांस मिळेल. त्यांच्या अभावीं तिचे पुत्र घेतील.' १३ ( ३६६.) पूर्वी सांगितलेल्या पारिभाषिक स्त्रीधनांत शुल्क या नांवाचें स्त्रीधन सांगितलें आहे, तें स्त्रीधन पहिल्यानें सख्ख्या भावांस मिळेल. त्यांच्या अभावीं आईस मिळेल; परंतु ती जर विवाह झाल्यानंतर मेली असेल तर वर सांगितल्याप्रमाणे मिळेल, आणि विवाहापूर्वीच जर ती मेली असेल, तर उभयतांचा खर्च वजा करून बाकी राहि- लेले द्रव्य नवऱ्यास मिळेल. कन्येचें वाग्दान होऊन विवाह झाला नसेल त्या स्थळ हा प्रकार लागू आहे असे समजावें. ' ( ३६७.) सामान्यतः कोणत्याही रीतीचें जंगम स्त्रीधन. याचें दान किंवा वि ११. वीर. प. २१८ व २१९ पृ २ रे पं ४४ व पृ. १ पं. १-६. १२. व्य. म. भा. भा. २ पृ. २१३. १३. व्य. म. भा. भा. २ पृ.२१३. १४. व्य. म. भा. भा. २ पृ. २१३-१४