पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. २१३ मयूख व वीरमित्रोदय यांच्याप्रमाणेच सांगतो. दायतत्वकारादि ग्रंथकारांचेंही असेच मत आहे. व्यवहारमाधव ग्रंथीं दोन्ही मर्ते लिहिलेली आहेत; परंतु त्यांत अमुकच योग्य आणि अमुकच अयोग्य याविषयीं कांहीं विशेष सांगितलेलें नाहीं. मणीलाल रेवादत्त वि० बाईरेवा इं. ला. रि. १७ मुं. ७५८ ह्यांतील ठरावांत मुंबई हायकोर्टाने ह्यासंबंधाने बरीच चर्चा केली आहे. त्याचा आशय येणेंप्रमाणेः– जेथें व्यवहारमयूखाप्रमाणे निकाल करावयाचा आहे तेथें जरी स्त्रीधन अपारिभाषिक असले तरी त्याचा वारसा स्त्रीच्या मुलींना मिळतो, नवऱ्याला मिळत नाहीं. स्त्रीला वारश्यानें मिळालेली इस्टेट तिच्या पाश्चात् शेवटच्या पुरुषाच्या वारसांस जावयाची हा नियम स्त्रीधनाला लावावयाचा नाहीं. त्याचे वारस स्त्रीचे वारस होत, मग ते जरी नवऱ्याच्या कुटुंबांतील वारस असले तरी हरकत नाहीं. मयूख भाग ४, कलम १०, पंक्ती २६ ह्यांतील ‘ पुत्रादि ' ह्या शब्दाचा अर्थ 'पुत्र, पौत्र, व प्रपौत्र' इतकाच; आणि ‘ पंक्ति १४,२३,२४ ' ह्यांतील 'दुहितादि' ह्यांचा अर्थ 'दुहिता आणि त्यांचीं अपर्टो ' इतकाच. जें पारिभाषिक स्त्रीधन नाहीं त्यासंबंधानें 'पुत्रादि' 'दुहितादीच्या ' अगोदर येतात. मुलगे व मुली नसतील तेव्हां पारिभाषिक व अपारिभाषिक स्त्रीधनांचे वारस समान आहेत. मात्र पुरुष व स्त्री अपत्यांच्या दरम्यान दुसरी पारिभाषिक स्त्रीधनासंबंधानें अगोदर येतात, व अपारिभाषिकाच्या संबंधाने पहिली अगोदर येतात. मिताक्षराकाराप्रमाणेच मयूखकारही जुन्या स्मृतिवचनांतील स्त्रीधनाच्या जातींचा नाम- निर्देश अथवा परिसंख्या पूर्ण आहे असे मानीत नाहीं. जेवढे ह्मणून स्त्रीचें धन होतें त्याचा स्त्रीधन ह्या शब्दांत समावेश करतो. परंतु वारशाचा विचार करतेवेळी मिताक्षराकारांना सोडून देऊन, वचनांत निर्देश केलेले प्रकार, आणि न केलेले, ह्यांत फरक करतो. असे करतांना स्मृतिवचनांत निर्दिष्ट केलेल्या प्रकारांचे संबंधानें स्त्री अपयें पुरुष अपत्यांच्या अगोदर येतात असे ठरविणें सयुक्तिक दिसतें. इतर प्रकारांसंबंधानें मात्र ह्म० अपारि- भाषिकांसंबंधानें पुरुष अपत्यांना एकंदरीनें दिलेले अग्रेसरत्व लागू व्हावें. परंतु तेवढ्या वंशजांसंबंधानें दोन्ही प्रकारच्या अपत्यांच्या दरम्यान तें पाळण्याला उघड कारण दिसत नाहीं. वर निर्दिष्ट झालेल्या वारसक्रमामध्ये स्त्री वारसक्रमाचें नवीन मूळ धरली जाते. हा नियम ज्या इस्टेटीला लागतो त्यांत वारशानें स्त्रीस प्राप्त झालेल्या जिंदगीचाच समावेश होतो असे नाहीं, तर त्यांत जें कधीं नवऱ्याचें अथवा इतर नातेवाईकाचें ( मग नवऱ्या- कडील अथवा बायकोकडील असो ) असलें नसेल, परंतु तिनें स्वतः मिळविलेलें असेल, त्याचा समावेश होतो. अशी जिंदगी स्त्रीधन आहे; नवऱ्याची मिळकत नव्हे, व ती तिच्या वारसांकडे जाईल. नवन्याच्या वारसांकडे जाणार नाहीं. ह्या मुकदम्यांतील W