पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ६ धानें जें स्त्रीस मिळते त्याची परिगणना स्त्रीधनांत केली आहे; परंतु तसे मिळालेले स्त्रीधन हें सर्वच पारिभाषिक स्त्रीधन आहे असे दिसत नाहीं. त्याचप्रमाणे क्रयसंबंधाने जें मिळाले असेल तो क्रय जर स्त्रीधनामधून झाला असेल तर तें कयाने घेतलेले धन स्त्रोधनच होईल.' ५ (३६०.) आई मेल्यानंतर तिचें अन्वाधेयक व प्रीतिदत्त असे दोन प्रकारचें स्त्रीधन असेल तें कन्यांनी व पुत्रांनीं वांटून घ्यावे. हा सांगितलेला स्त्रीधनाचा विभाग नवरा जिवंत असला तरीही होतो. ज्या कन्या अविवाहित असतील त्या हे स्त्रीधन घेण्यास प्रथम अधिकारिणी होतात. त्यांनीं विवाहित भगिनी असतील तर त्यांस मानाकरितां कांहीं यत्किचित् द्यावें. अविवाहित कन्या नसतील आणि सभर्तक विवाहित मात्र असतील, तर त्याही आपल्या भावांबरोबर आईच्या धनाचा विभाग वेतील. मातृ. धनाचा विभाग करिते समयीं कन्यांच्या कन्या असतील त्यांसही त्यांच्या गरीबीकडेस व मातबरीकडेस पाहून किञ्चित् किञ्चित् द्यावें, अर्से म्हटलेलें आहे. ७ (३६१.) यौतक या नांवाचे सांगितलेले स्त्रीधन ज्या कुमारी कन्या असतील त्यांनीच घ्यावे. पुत्र किंवा विवाहित कन्या असतील त्यांस मिळणार नाहीं. ८ १ अन्वाधेयक, २ प्रीतिदत्त, व ३ यौतक, हे तीन प्रकारचें स्त्रीधन सोडून, इतर स्त्रीधन कन्यांसच मिळेल. त्यांत पहिल्यानें ज्या अविवाहित असतील त्यांस मिळेल. त्यांच्या अभावी निर्धन व अनपत्य अशा विवाहित कन्या घेतील. त्यांच्या अभावीं सघन व सभर्तक अशा कन्या घेतील; त्यांच्या अभावीं विधवा असतील त्या घेतील असे सांगितलेले आहे. ९ ( ३६२.) विज्ञानेश्वर तर सर्वच स्त्रीधन पुत्रादिक असतांही पहिल्यानें क- न्यांनींच घ्यावें; त्यांच्या अभावीं कन्यांच्या कन्यांनीं घ्यावें; त्यांच्या अभावी दौहित्रांनी घ्यावें; त्यांच्या अभावीं पुत्रादिक घेतील असे सांगतो." वीरमित्रोदय व मयूख हे अन्वाधेयक, प्रीतिदत्त, आणि यौतक, या तीन प्रकारच्या द्रव्यांविषयी निराळा विभाग- प्रकार सांगून इतर पारिभाषिक स्त्रीधन कन्यांनी घ्यावें अर्से सांगतात. जीमूतवाहनही ५. मि. भा. पृ. २३८ ता. २४० आणि वीरमित्रो. व व्यवहारमयूख यांतील स्त्रीधनप्रकरणे पहा. ६. वीर. प. २१६ पृ. १-२. ७. धीर. प. २१६ पृ. २ पं. ९-१०. ८. वीर. प. २१६ पृ. २ पं. १२-१३, बं. ला. रि. वा. २ पृ. ११४ (दि. अपिलें ) ९. वीर. प. २१७ पृ. २ पं. ४-५ अविवादित कन्या नसतील तर सौभाग्यवती कन्यांना भावांबरोबर मिळतें. इं. ला. रि. ९ मुं. ११५. १०. वीर. प. २१७ पृ. १ प. १३ व १४.