पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र, प्र० १ अर्थः--धर्म आचारापासून उत्पन्न झालेला आहे;- धर्मामध्यें वेद प्रतिष्ठित; वेदांनीं यज्ञ उत्पन्न केले ( सुरू केले ); यज्ञांमुळे देव प्रतिष्ठित झाले. महाभारत वनपर्व अ० ३१३ श्लोक ११७८० ३०९, पृ० २:-- 'तर्फेऽप्रतिष्ठः श्रुतयोविभिन्नान को मुनिर्यस्यमतप्रमाणम् | धर्मस्यतत्वंनिहितंगुहायांमहाजनोयेनगतःसपन्थाः ॥ "" 66 अर्थः--तर्क निश्चयात्मक नाहीं. श्रुतींमध्ये परस्पर विरोधी मत आहेत; ज्याचें म- त प्रमाण असा एकही ऋषि नाहीं; धर्माचें तत्व गुहेमध्ये ह्मणजे तत्ववेत्त्यांच्या बुद्धीमध्ये ठेवलेलें आहे; ह्यासाठी तत्ववेत्त्या बहुत जनांनी स्वीकृत जो मार्ग त्या वाटेनें जावें ह्म०. त्यांनी पाळलेला आचार आपण पाळावा. वरील श्लोकावर नीलकंठांनी केलेली टोका:--" तर्कइति अप्रतिष्ठः निर्णयशून्यः; श्रुतयोपिविभिन्नाः परस्परविभिन्नार्थवादिन्यः; मुनयोपितव्द्याख्यातारः अतः तासु धर्मशास्त्रादिविद्यासु श्रममकृत्वा बहुजनसंमतमेव मार्गमनुसरेत्. ताशाएव; अर्थः -- तर्क अप्रतिष्ठ ह्म० निर्णयशून्य आहे; श्रुति देखील विभिन्न ह्म० परस्पर- विरुद्ध अर्थाचें प्रतिपादन करणाऱ्या आहेत; जे मुनि त्या व्याख्या करतात ते- सुद्धां त्याच मोसल्याप्रमाणेः त्यांची मतें विरोधी आहेत; ह्मणून धर्मशास्त्रादिकांच्या • ज्या अनंत शाखा त्या शिकण्याचा प्रयत्न करूं नये व बहुजनसंमत जो मार्ग तो. स्वीकारावा. विज्ञानेश्वर ह्मणतोः--“ लोकसिद्धस्यानुवांदकान्येव प्रायेणास्मिन्प्रकरणेवचनानि. ” अर्थः-- ह्या प्रकरणामध्ये (दायविभाग) लोकाचारास जुळणाऱ्या वचनांचाच बहुश: उल्लेख केलेला आहे. मित्रमिश्र ह्मणतोः-- “ प्रायेणव्यवहारस्मृतीनांलोकसिद्धार्थानुवादकत्वंइतिसकलनिच- न्धुभिरभिधानात्. " अर्थः -- कारण सर्व निबन्धकर्ते [वीर० प० १६४ पृ० १ ओळ ११] व्यवहारसंबंधी स्मृती लोकाचाराचा अनुवाद करितात असें ह्मणतात. बृहस्पति ह्मणतोः--“देशस्थित्यानुमानेननैगमानुमतेनच । क्रियतेनिर्णयस्तत्रव्यवहार- स्तुकथ्यते. " अर्थः-- ज्यामध्ये देशस्थितीला, अनुमानास अनुसरून, व नैगमांचें ( लोकांचें ) मत. घेऊन ठराव करतात त्यालाच व्यवहार ह्मणावें. यद्यदाचर्यते येनधर्म्यवाऽधर्म्यमेववा || देशस्याचरणं नित्यंचरित्रं तद्धिकीर्तितम्. " अर्थ:-जरी एखादें आचरण धर्माला अनुसरून असले अथवा नसलें तथापि तें जर देशाचारास अनुसरून असेल तर त्याला चरित्र ह्मणावें.