पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें, परिच्छेद ३ रा. दायविभागः स्त्रीधनाविषयीं. (३९८.) आतां पूर्वी सांगितल्याप्रमाणे ' स्त्रीधनाविषय विचार करूं. ज्या धनावर केवळ स्त्रीचेंच स्वामित्व आहे असें जें धन त्यास स्त्रीधन ह्मटलेले आहे. या स्त्रीधनाचे अनेक भेद ग्रन्थकारांनीं सांगितले आहेतः १ पितृदत्त, २ मातृदत्त, ३ भर्तृदत्त, ४ भ्रातृदत्त, ५ अध्यग्नि, ६ आधिवेदनिक, ७ अध्यावहनिक, ८ प्रीतिदत्त, ९ सौदायिक, १० शुल्क, ११ अन्वाधेयक, १२ यौतक, १३ रिक्थसंबंधानें जें मिळेल तें, १४ ऋयसंबंधाने मिळाले तें, १५ अधिगमानें जें मिळालें तें, १६ परिग्रहानें जें सत्तेत आले तें, आणि १७ बंधुदत्त. २ (३१९.) पित्यानें जें दिलें तें पितृदत्त; २ आईनें जें दिलें तें मातृदत्त; ३ नव- ज्यानें जें दिलें तें भर्तदत्त; ४ मावानें जें दिलें तें भ्रातृदत्त; ५ विवाहकालीं मामापासून वगैरे जें स्त्रीस प्राप्त होतें तें अध्याग्नि; ६ दुसरे लग्न करतेवेळी पहिल्या बायकोस जें नवऱ्याने दिले ते आधिवेदनिक; ७ कन्येला माहेराहून सासऱ्यास नेते समयीं जें मिळतें तें अध्यावहनिक; ८ जेव्हां वधु सासूसासरा यांच्या पायां पडावयास जाते तेव्हां जें त्यांनी प्रीतीनें तिला दिले असेल तें प्रीतिदत्त ( यास शास्त्रकारांनी पादवंदनिक असेंही नामांतर दिलें आहे ); ९ लग्न ल्यानंतर नवऱ्याच्या घरी किंवा माहेरीं भावांपासून व आईबापांपासून प्राप्त होतें तें सौदायिक; • जें द्रव्य घेऊन कन्या दिली जाते तें शुल्क; ११ लग्न झाल्यानंतर जें दिले जातें तें अन्वाधेयक; १२ विवा- हादि समयीं पतिसहवर्तमान एकासनी उपविष्ट असतां जे मिळेल तें यौतक; रिक्थसंबं- १. कलम २६८ चे शेवटी पहा. २. अर्से धन नवऱ्यास, व दुसरें धन, भाऊ आई व बाप यांस बंगाल्यांत मिळतें: पहा बं. ला. रि. वा. ११, पृ. २८६. ३. येथें शुल्क ह्मणजे कन्येची किंमत असे समजूं नये, तर कन्येच्या अलंकारांसाठी किंवा तिच्या संसारास उपयोगी पडणाच्या साधनांसाठी जे द्रव्य वरपक्षाकडून घेतात तें; झणचे कन्येचे मातापित- रादिक कन्येच्याच उपयोगाकरितां जे वरपक्षाकडून घेतात, ते शुल्क होय. वीर. प. २१५ पृ. १ पं. ३ ४. ४. व्य. म. भा. २ पृ. २१०.