पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. २०९ ( ३५३. ) कोणी बैरागी याणें एक बायको बाळगिली. तिच्या पोटीं त्यास पुत्र झाला. पुढे त्याच्या मरणानंतर त्या पुत्रानें वारशाच्या हक्कानें मयताच्या मठाची गादी आपणास मिळावी आणि ज्या अर्थी मी मयताचा पुत्र आहे त्या अर्थी मी त्याचा शिष्य आहेच अशी तकरार केली. प्रतिवादीनें तकरार केली कीं, मी मयताचा चेला आहे या स्तव संप्रदायाप्रमाणे गादीचा अधिकारी मी आहे. ती चेल्याची तकरार शाबीत होऊन वादीचा दावा रद्द झाला. 68 ( ३५४. ) कोणी गुरु मयत झाल्यास त्याचा दाय घेण्याचा वारसा अथवा वि भाग करण्याचा वारसा त्याच्या चेल्यांस आहे असें नाहीं. परंतु मयत गुरूनें ज्यास नेमलें असेल, व ज्याची नेमणूक त्या पंथाच्या दुसऱ्या महंतांनी कायम केली असेल, त्यास मयताची गादी मिळते. कांहीं ठिकाणी त्या महंतांना निवडण्याचा अधिकार असतोः ( इं. ला. रि. १ अ. ५३९). ८७ ( ३५५. ) कोणी गोसावी जर देवालयाचा महंत असेल तर त्याच्या इस्टेटीची व्यवस्था संन्याशास जे नियम लागू आहेत त्याप्रमाणे होईल. अशा महंताचें लग्न कायदे- शीर नसून, त्याच्या विधवेस दाय घेण्याचा अधिकार नाहीं." ८८ ( ३१६. ) जर कोणी स्त्री गोसाव्याची शिष्यीण असेल तर तिला गुरूच्या जिंद- गीचा वारसा मिळणार नाही, कारण असा वारसा मिळणें तो चेल्यास मात्र मिळतो; आणि जर कोणी जमीनदारानें गोसाव्यास निरंतर चालण्याच्या इराद्यानें जमीन दिली असेल आणि त्या गोसाव्याचे कोणी वारस नसतील, तर त्या जमिनीचा वारसा, दे- णारास न पोंचतां, ती बेवारशी जिंदगी ठरून राजास मिळेल, असा ठराव झाला आहे." ८६. सदर्लंड्स वीक्ली रि. वा. १ पृ १६० स्पे. अ. नं. १०५४ सन १८६४. लिंगाईत लोकांमध्ये दोन प्रकारचें मठ असतातः एक पुत्नवर्ग व एक शिष्यवर्ग. त्यांतून पुत्रवर्गाच्या मठांतं पुत्रादिकांस इतर गृहस्थांच्या दायाप्रमाणे वारसा मिळतो; परंतु शिष्यवर्गाचा जो मठ असेल त्याचा वारसा विरक्त शिष्यासच मिळतो. लिंगाइतांच्या चालीप्रमाणें अविवाहित लिंगाइतांच्या मठास विवाहित शिष्यही वारस होत नाहींत, ह्मणून तशा मठाचा वारसा अविवादित विरक्त शिष्यासच मिळू शकेल, असा ठराव झाला आहे. मुंबईच्या हा. कोर्टाचें स्पे. अ. नं. ७४ सन १८६६ चें, ता. १९ डिसेंबर १८६६. ८७. आप्रा स. दि. अ. चे. निवडक रि. वा. १., पू. ३०९ ता. २९ सपटंबर सन १८५२. ८८. आग्रा स. दि. अ. चे निवडक रि. वा. २. ४९ ता. २२ मे सन १८५४. ८९. आग्रा स.दि. अ. चे निवडक रि. वा. २ पू. २३५ ता. ३१ जुलई सन १८५५, २७