पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ हिन्दुधर्मशास्त्र. द्रव्य आचार्य, सच्छिष्य, व एकतीर्थी धर्मभ्राता, हे अनुक्रमानें घेतील असे शास्त्र आहे." ( ३९०.) बैरागी व गोसावी इत्यादिकांचाही वानप्रस्थांतच अंतर्भाव करितात. जेथें गोसावी लोकांचे मठ असतात तेथें त्या मठाचा जो मुख्य असतो, त्यास महंत अर्से ह्मणतात; तो महंत आपल्या मार्गे मुख्य चेला नेमून ठेवितो, अथवा त्याच्या सांगीवरून अथवा देशरिवाजाप्रमाणे जवळच्या मठांचे दुसरे महंत, अथवा चाल असेल त्याप्रमाणें दुसरे लोक त्याच्या प्रमुख शिष्यास गादीवर बसवितात. मग तो त्याच्या मठाचा अधिकारी होतो." दक्षिणत गोसावी गुरूला आपल्या चेल्यांपैकी पाहिजे त्यास आपला वारस नेमण्याचा अधिकार आहे. ८३ ( ३५१.) एका श्रावक गुरूच्या शिष्याने आपण मयत गुरूचा वारस अशा ह क्कानें आपल्या पंथाचें सुरत येथील एक देवालय कबजांत घेण्याचा दावा केला. त्यांत चौकशीअंती असे दृष्टीस पडलें कीं, त्या पंथांतील लोकांचा जो मुख्य शेट अहमदाबाद येथें आहे त्याजकडे सदरहू देवालयाचा गुरु नेमण्याचा पूर्ण अधिकार असून, त्यानें दुसऱ्याची नेमणूकही केली आहे यास्तव त्या चेल्याचा दावा रद्द करण्यांत आला. ८४ ( ३५२.) कोणी भक्तिदास या नांवाच्या वैराग्यानें एक मंदीर संपादन केलें. तें त्याच्या एका शिष्यानें दुसन्यास दिलें. पुढे दुसऱ्या शिष्यांनी फिर्याद केल्यावरून असा ठराव झाला कीं, बैरागी लोकांमध्ये प्राचीन अव्याहत संप्रदाय असा आहे कीं, संपादकाचे जितके चेले असतील तितक्यांचें त्या मंदिरांत सारखे स्वत्व आहे; यास्तव एकानें दिलेली देणगी रद्द करून फिर्यादीच्या ताब्यांत मंदीर द्यावें असा ठराव झाला. ८५ ८१. मि. भा. पू. २३१, २३२. ८२. मा. डै. वा. १ पृ. ३३०, क. १८८ व १९० पहा. ८३. त्रिंबकपुरी वि. गंगाबाई इं. ला. रि. ११ मुं. ५१४; ई. ला. रि. ४ क. ५४३ पहा. ८४. बा. रि. वा. १ पृ. ३५१ ता. ७ मार्च १८०९. ८५. सदर्लंड्स वी. रि. वा. १ पृ. २०९ स्पे. अ. नं. ७८१ सन १८६४, यांत बंगाल हायको- र्टानें असा ठराव केला आहे की, जरी कोणी नांवाचे बैरागी असून त्यांतून कोणी आश्रमांतर केलें नसेक तर तितक्यावरून त्यांचा दाय घेण्याचा अधिकार जात नाहीं.