पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. २०७ पहात होतें तो सरकारचा दावा रद्द केला. तो सर्व ठराव वाचून पाहिला ह्मणजे मातृ- बंधु, पितृबंधु, आत्मबंधु, इतके मिताक्षराकाराने सांगितल्यावरून बंधूंची संख्या समाप्त झाली असें नाहीं असा ऊह काढिला आहे. परंतु मुंबईच्या हायकोर्टानें मोहनदास वि. कृष्णाबाई ह्या कज्यांत असें ठरविलें आहे कीं, मामा हे बंधु असून ते मावशीच्या मुलां- पूर्वी वारशास लागू होतातः ( पहा इं. ला. रि. मुं. वा. ५ पृ. ५९७.) ह्याशिवाय दुसरे ठराव पहाण्याजोगे आहेत ते नमूद करितों. ( मू. इं. अ. व्हा. १२ पृ. ४४८; बं. ला. रि. व्हा. १ पृ. ४४ प्रि. कौ.). ठाकूर जीवनाथसिंग वि. कोर्ट आफ् वार्डस्, ( ला. रि. इं. अ. वा. २, पृ. १६३ - १६८.) ह्या कज्यांत मयताचा आतेबंधु ह्यानें आपली आई मयतानें पुत्रिका अशी ठरविली होती ह्मणून आपणास वारसा मिळावा असें मागणें मागितलें. ते त्याचें मागणें कोटीनें नाकबूल केलें. त्या कज्यांत पृ. १६६ व १६७ ह्यांत पुत्रिकेविषयीं बरींच वचनें दिलेली आहेत; परंतु त्यांत शेवटीं ठराव झाला आहे तो असा कीं, मयताचा प्र-प्र-प्रपितामह ह्याचा पणतू ह्याचा वारसा आतेच्या मुला- पेक्षां अधिक मजबूत आहे. दुसरे वारस नसतील तर मुलांच्या मुलीचा मुलगा बंधु ह्या नात्यानें घेऊं शकेल ( इं. ला. रि. ११. म. २८७ चुलत भाऊ भावाच्या नातवाच्या अगोदर मिताक्षरेप्रमाणे येतो. ( इं. ला. रि. ५ म.२९१. ) ( ३४७. ) याप्रमाणें व्याख्या केली ही अविभक्त गृहस्थाच्या व विभक्त गृह- स्थाच्या दायाची होय. (३४८.) कोणी उपकुर्वाण" ब्रह्मचारी याचें द्रव्य असल्यास तें त्याचे आई- बाप इत्यादि वारस जसे वर विभक्त गृहस्थाविषयीं सांगितलें त्याच क्रमानें घेतील." ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी इत्यादिकांच्या वारशाविषयीं. 66 किंवा ( ३४९.) वस्तुतः विचार केला असतां ब्रह्मचान्यास जिंदगी मिळण्याचा संबंध दिसत नाहीं; कारण भिक्षु ह्मणजे संन्यासी यानें संग्रह करूं नये असें गौतमवचन आहे; आणि ज्यांनीं आश्रमांतर केलें ते अनंश होतात अशी वसिष्ठस्मृति आहे; परंतु वानप्रस्था एक दिवसापुरता, अथवा एक महिन्यापुरता, सहा महिन्यांपुरता, अथवा एक वर्षापुरता धान्यसंचय करावा, आणि [ अधिक ] केलेला आश्विनमास टाकावा" [ आणि तीर्थयात्रेस जावें ] असें ह्मटलेले आहे; तेव्हां अर्थातच धनसंबंध उत्पन्न झाला. त्याचप्रमाणें ब्रह्मचारी व संन्यासी यां- सही पुस्तकें व कौपीनादि वस्त्रेही आहेतच; तेव्हां या सर्वांसही दाय असून, त्या चे अधिकारी कोण हें ठरविणें अवश्य आहे. आतां या तीनही प्रकारच्या मयतांचें ७९. उपकुर्वाण ह्मणजे गुरूच्या घरीं वेदाध्ययन करणारा, जो पुढें गृहस्थाश्रम करबो तो. नैष्टिक- ब्रह्मचर्य कलियुगीं निषिद्ध आहे. ८० मि. भा. पू. २३१, ध्य. म. भा. भा. १ पू. १९७-९८.