पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ ७० नात्याचे आहेत. याप्रमाणे सर्व सपिंड व समानोदक नात्याच्या निकट संबंधानें जिंदगीचे वारस होतात. समानोदकांना बंधु अथवा भिन्नगोत्र सपिंड ह्यांच्या अगोदर वारसा प्राप्त होतो." जे सारख्या अंतरावरच्या नात्याचे असतील ते सारखे विभाग करून घेतील असा नियम आहे. लांबच्या गोत्रज सपिंडांमध्यें दर इसमास इस्टेट मिळेल. " गोत्रज सपिंडांच्या विधवांस वारसा मिळतो असें ठरले आहे. * ७१ ७२ सख्ख्या चुलत भावापेक्षां विभक्त हिंदूची विधवा सून ही नजीकची वारस आहे ह्मणून तिला प्रथम इस्टेट दिले पाहिजे. अ ७३ निर्दिष्ट केलेल्या गोत्रजं सपिंडांच्या विधवांच्या दरम्यान सावत्र आई सावत्र भावाच्या विधवेपेक्षां अगोदरची आहे, कारण तिचा नवरा बाप ह्या नात्याने सावत्र भावाच्या अगोदर येतो. " ७४ मिताक्षरा प्रांतांत निपुत्रिक विभक्त पुरुषांची आई त्यांच्या विधवांनंतर व बा- पाच्या अगोदर येते. ७५ विधवा चुलतीच्या अगोदर चुलत्याचे मुलगे येतात, कारण एकाच पिढीतल्या गोत्रज सपिंडांत पुरुष स्त्रियांच्या अगोदर येतात." ( ३४६.) गोत्रजांच्या अभावीं बंधू जिंदगी घेण्याविषयीं अधिकारी होतात. हे बंधू नऊ प्रकारचे आहेत असें पूर्वी वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे बांधवांच्या अ भावी जे पुढे इतर वारस होतात त्यांचा क्रम पूर्वीच वर्णिला आहे. अलीकडे हा सर्व क्रम एकीकडे ठेवून एक फैसला मयताच्या सान्निध्याच्या अनुरोधानें झाला आहे. मद्रासेंत सावत्र मामा बापाच्या आतेभावाच्या अगोदर येतो कारण तो आत्मबंधु आहे, व आईचा बाप आतेच्या अगोदर येतो. ७८ गिरिधारिलाल वि. बंगाल सरकार ( मू. इं. अ. व्हा. १२ पृ. ४४८ ) ह्या कामांत बंधु कोण ह्याचा विचार करून मयत उपेंद्र चंद्रराय ह्याच्या बापाचा मामा हा मित्रमिश्राच्या अभिप्रायाप्रमाणे बंधुवर्गातच आहे असें ठरवून बेवारिस माल सरकार घेऊ ७०, बाई देवकोर वि. अमृतराम जमियतराम इं. ला. रि. १० मुं. ३७२. ७१. नागेश वि. गुरुराव इं. ला. रि. १७ मुं. ३०३. ७२. लल्लूभाई वि. माणकुवरचाई इं. ला. रि. ३ मुं. ३८३; व ला. रि. इं. अ. वा. ७१ २१२; इं. ला. रि. ५ मुं. ११०. ७३. विठ्ठलदास वि. जेशुबाई, इं. ला. रि. ४ मुं. २१९. ७४. रखमाबाई वि. तुकाराम इं. ला. रि. ११ मुं. ४७, .७५. बाळकृष्ण बापूजी आपटे वि. लक्ष्मण दिनकर इं. ला. रि. १४ मुं. ६०५. ७६. राचव्वा वि. कलिंगप्पा इं. ला. रि. १६ मुं. ७१६. ७७. मृटुस्वामी वि. मुदुकुमारस्वामी इं. ला. रि. १६ म. २३. ७८. चिन्नामल वि. वेंकटाचल इं. ला. रि. १५ म. ४२१.