पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. २०५ म. ३०० ). तेथे जवळचे इतर पुरुष वारस नसतील तर मुलीची मुलगी आजाची बंधु या नात्याने वारस होते ( रामप्पा उदयन वि० अरुमुगथ उदयन, ई० ला० रि १७ म० १८२ ) ( ३४४. ) बहिणीच्या अभावी पितामह व सापत्न भाऊ यांणीं मयताची जिंदगी विभागून घ्यावी; कारण या दोघांचें नातें मयतापासून सारख्या अंतरावर आहे. ह्मणजे, पितामह हा मयताच्या बापाचा बाप, आणि सावत्र भाऊ हा मयताचा बापाचा मुलगा; मिळून संबंधाचें अंतर सारखेच होतें." चुलत भावापेक्षां बहिणीचा वारसा विशेष मानला गेला आहेः पाहा लक्ष्मी वि० दादा, इं० ला० रि० मुं० व्हा० ४ पृ० २१०; व बिडु वि० खंडु, पं० २१४. जशी मुलींची सघनता व निर्धनता मानतात तशी बहिणींची मानीत नाहीत. भागि- थींबाई वि० बया, इं० ला० रि० मुं० व्हा० ५ पृ० २६४. सावत्र बहिणी व बहिणी यांचा वारसा सावत्र आई व सख्खी चुलती यांच्याहून अधिक मानला गेला आहे; ई० ला० रि० मुं० व्हा० ४ पृ० १८८ केसरबाई वि० वल्लभ. मद्रासेंत सावत्र बहीण वारस नाहीं. (इं० ला० रि० ५ म०२९) बापा- ची बहीण घ मुलाची मुलगी वारस होऊं शकतील. (इं० ला० रि० १३ म० १० व १४ म० १५९). बहिणीचा मुलगा ( भाचा ) काशीकडे सरळ वारिस नसले तरी भाच्यास मामाचा वारसा मिळत नाहीं; आणि विनायक आनंदराव वि० लक्ष्मीबाई ( मू० ई० अ० व्हा० ९ १० ११६ ) व इच्छाराम वि० परमानंद ( बा० रि० वा० २ १० ४७१) हे मुंबईकडील ठराव फरकाबादेस (प- श्चिमोत्तर देशांत ) लागू नाहींत; आणि मयताच्या विधवेनें दत्तक घेतला त्याविषयीं ह- रकत काढण्याचा मोहनलाल भाचा ) यास हक्क नाहीं. ( पाहा ठाकुरीण साहेब व दु- सरा वि० मोहनलाल, मू. इं. अ. वा. ११, पृ. ३८६ ). ह्यांत बंधु शब्दाची बरीच वाटाघाट केलेली आहे. भाचा हा सपिंड या नात्यानें वारशास लागू होत नाही: श्रीनिवास वि० रंगस्वामी इं. ला. रि. म. व्हा. २ पृ.३०४. बंधू या नात्यानें मद्रासेस बहिणीच्या अगोदर येतो. इं० ला० रि० ५ म० २४१ ) हा बंधु असे मानतातः बहिणीच्या मुलांचा मुलगा. उमेद बाहादुर वि. उदयचंद, इं. ला. रि. क. व्हा. ६ पृ. ११९. ( ३४५.) पितामह व सापत्न भाऊ यांच्या अभावीं प्रपितामह, चुलता, व सावत्र भावाचा मुलगा, हे समविभाग करून घेतील; कारण हे तिघेही मृताचे सारख्या ६९ व्य. म. भा. भा. २ पृ. १९५-९६. मि भा. पू. २२९ व्य. म. भा. २.