पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र०. ( ३४०.) याचप्रमाणे बहिणीस दायाचा अधिकार नाही असा मद्रास सदर दि- वाणी अदालतीनें ता. १९ नवम्बर सन १८५९ रोजी ठराव केला होता; आणि बहि- णांच्या मुलासही वारशाचा हक्क नाहीं असेही त्याच इलाक्यास लागू ठराव झाले आहेत." परंतु बहीण घेते असा ८ म. हा. को. ८८ ह्यांत ठरले आहे. ( ३४१. ) याप्रमाणें विज्ञानेश्वरानें व्यवस्था केली आहे, तथापि मुंबई इलाक्याम- ध्यें व्यवहारमयूख हा ग्रंथ विशेष मान्य धरिलेला आहे आणि मयूखकारानें तर बहि- णांचा दाय घेण्याचा अधिकार स्पष्टपणे सांगितला आहे आणि ती भावाच्याच गोत्रांत उत्पन्न झाली ह्मणून तीही गोत्रजच होय; यास्तव, पितामहीच्या अभावीं बहीणच वारस होय असें सांगितले आहे. मनूने असे सांगितले आहे ( अ. ९ श्लो. १८७ ) की, सपिण्डांमध्यें जो जो जवळ असेल तो तो जिंदगी घेईल. हाही वरील मतास आधार आहे; आणि याप्रमाणे विनायक आनंदराव व दुसरे वादी वि. लक्ष्मीबाई विधवा व दुसऱ्या प्र० वादी, या कज्जाचा इनसाफ ता० २८ मार्च स० १८६१ रोजी मुंबईच्या सुप्रीम कोर्टात होऊन मुंबई इलाक्यांत मयूखाच्या आघावरून बहिणीस वारसा पोचतो असा ठराव झाला; आणि तो प्रिव्ही कौन्सलान फेब्रुआरी स० १८६४ मध्ये कायम केला आहे.' हा वारसा प्रत्येकीस स्वतंत्र मिळतो व तें तिचें स्त्रीधन होतें. रिंडा- बाई वि० अण्णाचार्य ( इं० ला० रि० १५ मुं० २०६ ). अलाहाबादेस बहिणीला वारसा नाहीं. ( इं. ला. रि. ५ अ. ३११.) ६६ २०४ ( ३४२. ) एक हिंदु मयत झाला. त्याला त्याच्या आईच्या बापाकडून कांहीं मिळकत मिळालेली होती. तिचा वारसा त्याच्या मरणानंतर त्याच्या चुलतीस न मिळतां त्याची बहीण व बहिणीचे मुलगे यांस मिळावा असा ठराव झाला. ६७ ( ३४३. ) एक हिंदु मरण पावला. त्याच्या तीन बहिणी होत्या. त्यांतून दोघी तो हयात असतां मरण पावल्या, व त्यांतून प्रत्येकीला एक मुलगा व मुली होत्या, आणि तिसरी बहीण तो मेला त्या वेळी हयात होती. त्या वेळी असा ठराव झाला की, ती हयात असलेली बहीण मयताची योग्य वारस होय, आणि तिनें खुशीनें आपला वारसा सोडिल्याशिवाय इतर बहिणींच्या मुलांस कांहीं मिळावयाचें नाहीं." सावत्र बहिणीच्या मुलाला मद्रास इलाख्यांत वारसा मिळतो ( सुब्बराया वि० कैलास इं० ला० रि० १५ ६५. म. स. दि. अ. चे रि. सन १८५८ पृ. २०९ ता. १३ नवेंचर सन १८५८; व सदरहू कोटीचे रि. सन १८६० पृ. २४५; आणि म. हायकोर्ट रि. वा. १ पृ. ८५ ता. ७, १८, १९, नवेंबर, व २ डिसें- बर १८६२. ६६. मुंबई हा. रि. वा. १ पृ. ११७ तागाईत १२९. ६७. बा. रि. वा. १ पृ. ७१ ता. ६ अक्टोबर १८१३. ६८. बा. रि. वा. २ पृ. ४७१.