पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. २०३ टेश वि० पांडुरंग, मुं० हा० रि० व्हा० १२ पृ० ६५ यांत सावत्र भावाचा हक्क सख्या पुतण्याहून अधिक मानिला आहे. त्याचप्रमाणे सख्या चुलत भावापेक्षां सावत्र भावांचा वारशाचा हक्क अधिक मानतात. ह्या इलाख्यांत सावत्र दायादांविषयीं ठराव करितांना सावत्र भाऊ व त्यांचे मुलगे इतक्यांबद्दल वचनें आहेत, ह्मणून तितके पुरुष खेरीज करून त्यांच्या पुढच्या वंशजांविषयीं विचार करणे येईल तेव्हां एकंदर नियमांप्रमाणें जो सपिंड अति नजी- कचा वारीस असेल तो इस्टेट घेईल असा ठराव केला पाहिजे असें मुंबई हायकोर्टानें ठरविलें आहे. इं० ला० रि० मुं० व्हा० ६ पृ० ३९४ पहा. ( ३३५. ) पुतण्यांच्या अभावीं गोत्रज सपिण्ड जिंदगीचे वारस. त्यांतही पहि- ल्यानें पितामही ( आजी.) ( ३३६.) जो पूर्वी शास्त्रार्थ सापत्न आईविषयीं सांगितला तोच सापत्न पितामही- विषयीही जाणावा. ( ३३७. ) पितामहीच्या अभावीं बहीण जिंदगीची वारस. तिच्या अभावीं पिता- मह आणि सापत्न भ्राता यांणी अपुत्राची जिंदगी विभागून घ्यावी. ६२ ( ३३८.) आतां बहीण ही पूर्वी सांगितलेल्या सगोत्र सपिण्डांच्या क्रमांत येत नसून इतर दायादांमध्येही तिचें गणन होत नाहीं; आणि मिताक्षरेमध्येंही जे दायाचे अधि- कारी लिहिलेले आहेत त्यांत बहीण कोठें सांगितलेली नाही. " पुतण्याच्या अभावीं गोत्रज जिन्दगीचे वारस; गोत्रज ह्मणजे पितामही, सपिण्ड, व समानोदक; " इत्यादि लिहून पुढें पितामहीच्या अभावीं समानगात्रज, सपिण्ड, पितामह इत्यादिक जिंद- गीचे वारस, " असें सांगितले आहे. तसेंच “ पितृसंतानाच्या अभावीं पितामही, पितामह, चुलता, चुलतभाऊ, हे अनुक्रमानें जिंदगीचे अधिकारी होतात " असें ह्म- टलेले आहे.६३ ( ३३९. ) या विवरणामध्यें बाहर्णाचा कोठें समावेश होत नाहीं; आणि बंगाल हायकोर्टानें रे. अ. नं. २०४ स. १८६१, याचा फडशा ता. २९ सप्टंबर स. १८६३ रोजी केला, त्यांत मिताक्षरेच्या आधारावरून सोदर बहिणीला वारशाचा हक्क पोंचत नाहीं, व त्या कारणास्तव तिच्या पुत्रासही पोंचत नाही असा ठराव केला आहे. ६४ ६१. व्य. म. भा. भा. २ पू. १९५. ६२. मि. भा. पू. २२८ व २२९. ६३. सिवेस्टर रिं. वा. २ पृ. ४६०. याचप्रमाणे सदर्ल. वीं. रि. वा. १ पृ. ७४ ता. ६ सप्टेंबर १८६४ रोजी ठराव झाला आहे. ६४. म. स. दि. अ. चे रि. सन १८५९ पृ. २४७; व याचप्रमाणे म. स. दि. अ. चे रि. सन्. १८६० पृ. २४७ ता. ७ नवेंबर सन १८६० हाही ठराव आहे, इं० ला० ९क० ७२५.