पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. ५० ६ ( ३२८ अ.) दुराचरणाचा नियम आईस लागत नाहीं. (इं. ला. रि. ५ म. १४९, १ अ. ४६ ). ( ३२९. ) कोणी एका मनुष्यानें कांहीं इस्टेट कृष्णार्पण करून दिलें. पुढें तें घेणारा मरण पावला तेव्हां त्या इस्टेटाचा वारसा घेणाराच्या बापास मिळून कृष्णार्पण करणाराच्या कुटुंबास कांहीं मिळावयाचें नाहीं असें ठरलें. ५४ २०२ इतर वारिस. ( ३३०. ) वर सांगितले इतके वारस नसतील तर त्यांच्या अभावीं सोदर भ्राते जिंदगीचे वारस होतील." हे सावत्र भावांपेक्षां नजीकचे होतात. ५६ ( ३३१. ) त्याचप्रमाणे भावांचे मुलगे ह्मणजे पुतणे हेही विभाग घेतील. जसा नातवांचा विभाग पुत्रांच्या द्वारानें होतो तसा बंधूंच्या द्वारें पुतण्यांचा विभाग काढिला जाईल.५७ विभक्त भावाच्या मुलांना अविभक्त भावाच्या मुलांच्या विधवेच्या अगोदर वारसा प्राप्त होतो, कारण लांबच्या वारसांत चढाओढ लागली ह्मणजे नमूद केलेले अगोदर येतात; नंतर त्यांच्या विधवा. हा ठराव मयूखाप्रमाणे आहे." ५८ ( ३३२ ) एका ठिकाणी असा ठराव झाला आहे की, एका गृहस्थाच्या मरणा- नंतर त्याचा दाय त्याच्या विधवेस मिळाला; पुढे ती मेल्यानंतर तो दाय मयत नव- ज्याच्या लहान भावास मिळेल, मोठ्या भावाच्या मुलास मिळणार नाहीं. ( कलकत्ता स० दि० चे रि० वा० ३ रें पृ० १०६ ता० ८ आगस्ट १८२१. ) ( ३३३. ) भावांच्या अभावीं भावांचे मुलगे ह्मणजे पुतणे हे वारस होत असा ठराव झाला आहे. " मिताक्षरेप्रमाणें सावत्र भाऊ अगोदर येतात. ५९ ६० ( ३३४. ) सावत्र भावासही हिसा मिळतो. ( कलकत्ता स० दि० अ० रि० वा० ४ पृ० ११७ ); परंतु सोदर भ्राते नसल्यास सावत्रांस मिळेल. ६° कृष्णाजी व्यंक- ५४. बा० रि० वा० २ पृ० ५०२ तारीख २४ जुलई सन १८६३. याचप्रमाणे मा० डैजेस्ट वा • १ ले पृ० ३२१ क० १२५ व पृ० ३२२ क० १२७-१२८-१३० यांतील ठराव पहा. मू० इं० अ० ५२३. बंगाल्यांत अविभक्त कुटुंबांतही असेंच: ला० रि० ४इं० अ. १४७. इं० ला० रि० १ क० २७, २४, स० वी० रि० २३४ फु० बै० हा ठराव यमस्मृतीच्या आधारावरून केलेला आहे. तो ज्या कामांत झाला त्याची बहुतेक बिना वरील मि० मूर यांच्या रिपोर्टाच्या १४ व्या व्हा- ल्युमांत पृ० १५३-१५९ पर्यंत दिलेली आहे आणि त्यांत दायभाग, दायतत्व, दायक्रमसंग्रह इत्यादि बंगाल्याकडील निबंधांचा विशेषेकरून उपयोग झालेला दिसतो. ५५. मि. भा. पृ. २२८; व्य. म. भा. भा. २ पृ. १९४. ५६. व्य. म. भा. भा. २ पृ. १९४. ५७. बा. रि. वा. १ पृ. ४२७ ता. १५ सप्टेंबर सन १८१९० ५८. नेहाळचंद वि. हेमचंद इं. ला. रि. ९ मुं. ३१. ५९. व्य. म. भा. भा. २ पृ. १९४; मि. भा. पू. २२८. ६०. व्य. म. भा. भा. २ पृ. १९५.