पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ सबब त्यांचा वारशाचा हक्क राहिला नाहीं, सचब सर्व जिंदगीची वारिस तिसरी मुलगी आहे असा ठराव झाला. ४८ ( ३२३. ) ज्या मिळकतीचा दाय मुलीला पोंचला असेल ती मिळकत तिची झा- ली; ह्मणजे तिच्या मुलास अथवा नातवास मिळेल, तिच्या बहिणींस अथवा बहिणींच्या मुलांस मिळणार नाहीं: ( मा० डै० वा ० १ पृ० ३२० क० १ ७. ) . ती इस्टेट तिचें स्त्रीधन होतें व तें तिच्या वारसास जातें. मूळ पुरुषाच्या वारसांकडे येत नाहीं: ( भा- गीरथीबाई वि. कान्होजीराव ( फुलबेंच ) इं. ला. रि. ११ मु. २८५; जानकीबाई वि. सुंद्रा इं. ला. रि. १४ मुं. ६१२). ( ३२४ ). सख्ख्या भावाच्या नातवापेक्षां मुलीच्या मुलाचा वारश्याचा अधिकार मजबूत आहे. (कलकत्ता स. दि. अ. चे रि. वा. ४ थें पृ. ६७.) ( ३२९.) आजाच्या हयातीत मुलाचा मुलगा मरण पावला तर त्या नातवाच्या विधवेपेक्षां त्या आजाची मुलगी व मुलगा यांचा वारशाचा हक्क विशेष मजबूत आहे असा ठराव झाला आहे. ४९ ( ३२६. ) कोणी मनुष्याच्या पाटाच्या बायकोच्या पूर्वीच्या नवव्यापासून झाले- ला मुलगा किंवा त्या मुलाची विधवा, हीं कधींही वारसा पावणार नाहींत. मयताची मुलगी हीच त्याची वारस आहे. ५० एका मुलीने आपला हिस्सा मिळावा ह्मणून दावा आणला व तो मुदतीबाहेर गेला ह्मणून बुडाला तर त्या हुकुमनाम्याने तिचा मुलगा बांधला जातोः ( हरीनाथ वि० मथुरामोहन इं. ला. २१ क. ८ प्रिव्ही कौन्सिल.) बंगाल्यांतील वारशाच्या क्रमाप्रमाणे मुलीला जो वारसा मिळतो तो विधवेप्रमा- . णच मिळतो; ह्मणजे जितकें विधवेला स्वत्व प्राप्त होते तितकेंच कन्येला मिळतें असें ठर- विलें आहेः (मू० इं० अ० व्हा० ६ पृ० ४३३.). त्याच न्यायानें बंगाल्याकडील दुसऱ्या एका मुकदम्यांत असा ठराव झाला आहे की, त्या इलाख्यांतील ज्या प्रांतांतील लोकां- चा मिताक्षरेप्रमाणें इनसाफ होतो, त्या लोकांतही मुलीला वारसा मिळतो तो विध- वेप्रमाणेंच असतो, ह्मणजे तो तांहाहयात असा मानला जातो. पारिभाषिक स्त्रीधना- ४८. बा० रि० वा० २रें पृ० ४७१-४७२ नं० ८९; स्पे० अ० नं० २६७ सन १८६४ मुंबई हा० रि० वा० २ पृ० १० या कज्जांत वरील ठरावाविरुद्ध निर्णय झाला आहे; परंतु पहिला ठराव धर्म शास्त्रास विशेष अनुसरून आहे असे दिसते. ४९. मुं० स० दि० अदल० चे निवडक ठराव सन १८२० पासून १८०० पर्यंत पृ० १३२ ता० १३८ नं० ३२. ५०. मुंबई सदरदिवाणी अदालतीचें स्पे० अ० नं० ३२१४; मारिसचे रि० वा० ३रें पू० २१४.