पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दाय विभाग. १९९ “ पत्नी दुहितरश्चैव " इ० हें वचन येथें लागू व्हावें की काय, ह्याविषयींही विचार आहे. विधवेचें जें स्वतःचें द्रव्य, ज्यास स्त्रीधन ह्मणतात, त्याच्या वारसाचा प्रकार नि- राळा आहे. त्याचा विचार पुढे करूं. एकाद्या विधवेला वारसा प्राप्त झाल्यावर तिच्या नंतरच्या वारसाची वारसाप्राप्ति लव- कर घडवून आणतां येईल. मात्र तिनें त्याला आपला हक्क देऊन आपला ताबा सोडला पाहिजे.' ४३ कन्या व कन्यांचे पुत्र. ४४ ( ३१९.) विधवा स्त्रीनंतर दायाचा हक्क मुलींस मिळतो. त्यांतून ज्या अवि- वाहित असतील त्या प्रथम घेतील. त्यांच्या मागून विवाहितांस मिळेल. विवाहितांमध्यें ज्या निर्धन असतील त्यांस प्रथम हक्क पोंचतो, व मागाहून सघन असतील त्यांस हक्क त्या दुराचरणी असल्या तरी त्यांचा वारश्याचा हक्क जात नाही. पोंचतो.अ ४४ब ( ३२०. ) पुत्रवती व निपुत्रिक कन्या यांमध्ये भेद करून प्रथम पुत्रवती दायास अधिकारी व मागाहून निपुत्रिक असे इतर इलाख्यांमध्ये मानितात. ४५ परंतु मु बई इलाख्यांत विवाहित आणि अविवाहित, आणि सधन व निर्धन या दोन कारणां- वरून मात्र दाय पोंचतो किंवा पोचत नाही याचा निर्णय करितात. ६ ( ३२१.) जंबू ब्राह्मणांमध्यें बाप विभक्त असो अथवा एकत्र असो, त्याला पुत्र नसल्यास त्याची कन्या त्याच्या पाठीमागें त्याची वारस होते. ४७ (३२२.) रूपचंद नांवाच्या एका मनुष्यास तीन मुली होत्या. त्यांतून दोघी मरण पावल्या. त्यांच्या मुलांनी आपल्या आईच्या बापाच्या इस्टेटीबद्दल तंटा चालविला. त्यांत कोर्टाच्या नजरेस असें आलें कीं, मयताची तिसरी मुलगी ही अद्यापि हयात आहे. त्यावरून असा ठराव झाला कीं, धर्मशास्त्राप्रमाणे त्या दोन्ही मुलांच्या आई मरून गेल्या, ४३. बेहारीलाल वि० माधोलाल इं० ला० रि० १९ क. २३६. ४४. जमनाबाई वि. खीमजी इं. ला. रि. १४ मुं. १. ४४ ( अ ) . व्य० म० भा भा० २ पृ० १९३; मि० भा० पृ० २२५ व २२६. काशी- कडेही असेच. ला० रि० ५ इं० अ० ४०. इतरत्र पुत्रवती अगोदर येते. परंतु हक प्राप्त व्हावयाच्या वेळीं दोन्ही असल्या व एक मेली तर दुसरी जरी निपुत्रिक असली तरी हरकत नाही: ला० रि० २ इं० अ० ११३. ४४ (ब) आडव्याप्पा वि. रुद्रांव्वा इं. ला. रि. ४ मुं. १०५. ४५. इंडियन जूरिस्ट वा० १ पृ० २२ पहा; व मा० डै वा० १५० ३१९ क० १०७. ४६. अ० नं० ५०५ सन १८६३, बकुबाई, रामदास वृजभूकण याची विधवा, अपिलेंट वि. मंछा- बाई, मोतीलाल रामदास याची स्त्री, रिस्पॉडेंट, मुं० हा० रि० वा० २ पृ० ५. ४७. मुं० स० दि० अ० चे निवडक रि०, सन १८२० पासून १८४० पर्यंत, पृ० १२२.