पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ हिन्दु धर्मशास्त्र. हिसा देण्यांत येता. परंतु तिची वडील जाऊ मेल्यानंतर तिनें दावा आणिला, त्या वेळी सर्व इस्टेटीचा वारसा वडील भावाच्या मुलींस मिळाला होता ह्मणून तिचा मागण्या- चा हक्क नाहीं असा ठराव झाला: [ याविषयी शंका आहे. ] ३८ प्र० ( ३१६. ) जर कोणी निपुत्रिक हिंदु मरण पावेल आणि त्याच्यामागें त्याची सून असून दुसरा कोणी नजीकचा वारसदार नसेल, तर त्याच्या दौहित्रांस त्याचा दाय न मिळतां त्याच्या सुनेस मिळेल असा ठराव झाला आहे.” विधवा सुनेस सासयापासून वारशानें मिळालेल्या इस्टेटीचं आणि विधवेला नवऱ्यापासून मिळालेल्या इस्टेटीचें स्वरूप सारखे आहे... ४० (३१७.) अविभक्त हिंदूच्या विधवेस एकंदरांतील मिळकतीचा वारसा न मिळ- तां अविभक्त भावास मिळेल: ( बा. रि. वा. १ पृ. २५० व बा. रि. वा. २ पू. ४०१; ता० २२ फे० सन १८२३. ) परंतु स्वसंपादित मिळकतीचा वारसा विध- वेस पोंचतो असें मागें लिहिलेंच आहे; आणि त्याचप्रमाणें विभक्त असल्यास तर मिळ- तोच असेंही मार्गे सांगितले आहे. ४१ ( ३१८.) अ, ब, क, ड, असे चार भाऊ अविभक्त असतां, प्रथम अ हा निपुत्रिक मरण पावला, तेव्हां त्याच्या इस्टेटीचा दाय घेण्याचा अधिकार राहिले- ल्या तिघां भावांस मिळतो; आणि त्या प्रथम मयताच्या विधवेस अन्नवस्त्र मात्र मि- ळावयाचें. नंतर ब हाही निपुत्रिक मरण पावला, तेव्हां त्याच्या दायाचा अधिका- र राहिलेल्या दोघां भावांस मिळतो व दुसऱ्याच्या विधवेसही अन्नवस्त्रच मिळावयाचें. नंतर तिसरा क हा निपुत्रिक मरण पावला, तेव्हां त्याच्याही इस्टेटीचा ह्मणजे मयत तिघां भावांच्या इस्टेटीचा दाय घेण्याचा अधिकारी चवथा ड हा झाला, व कची विधवा हीही अन्नवस्त्राचीच मालक झाली. नंतर चवथा ड हाही निपु- त्रिक मरण पावला, तेव्हां त्याची विधवा सर्व इस्टेटीची वारशाच्या अधिकाराने मालक झाली. आतां असें होणें वस्तुतः पाहिले असतां रास्त दिसत नाहीं; परंतु धर्मशा- स्त्रांतील वचनावरून व हल्लींच्या झालेल्या निवाड्यांवरून असे होण्याचा संभव दिसतो. ४२ ३८. बा० रि० वा० २ पृ० ५८८ ता० ९ आगष्ट १८२३. ३९. बा० रि० वा० २ पृ० ५१० ता० १९ जुलई सन १८१७. ४०. गदाधरभट वि० चंद्रभागाबाई इं० ला० रि० १७ मुं० ६९०० ४१. याविषयीं मा० डै० वा० १ पृ० ३१८ कलम ९७, ९८, १०१, व पृ० ३१९क० १०६ यांतील कज्जे पहा. ४२. मा० ढै० वा० १ पृ० ३१४ क० ६९ व पृ० ३१७ क० ८६-८७-९० व ९१ यांतील ठराव हावे झणजे या मताचा आधार दृष्टीस पडेल. शिवाय, आग्रा स० अ० रि० सन १८६० पृ०७२९ पहा.