पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ हिजे तर उपभोगाच्या सोईकरितां आपसांत व्यवस्था करून घ्यावी: ( पहा जिजाई अंबा वि. कामाक्षीबाईसाहेब, मद्रास हा. रि. वा. ३ पृ. ४२४; श्रीगजपति नीलमणी वि. श्री- गजपति राधामणी, ला. रि. इं. अ. वा. ४ पृ. २१२; इं. ला. रि. म. वा. १ पृ. २९० व पृ. ३०० ) मुंबईमध्ये एकीहून जास्त विधवा असल्यास त्या सर्वोस सारखा हिस्सा अर्सेही एके ठिकाणी ह्मटलेलें आहे: ( पहा राम्या वि. भागी, मुं. हा. को. रि. पृ. ६६ व्हा. २, व पार्वती वि. भिकु, मुं. हा. को. रि. व्हा. ४ पृ. २५; अपी. शाखा ) ( ३०६. ) जर दोन विधवा असून त्यांतून एक मरण पावेल, तर सर्व इस्टेट दुसरीस मिळेल. दुसरीच्या मरणानंतर एकंदर इस्टेट पुढच्या वारसांस मिळेल. ३० ( ३०७. ) एका हिंदु विधवेनें दत्तक पुत्र घेतला. तो पुढे ती हयात असतां मरण पावला. त्याची विधवाही निसंतान होती. तेव्हां असा ठराव झाला कीं, सर्व इस्टे- टीची वारीस दत्तकाची आई आहे. पुढे मयताच्या विधवेनें, ह्मणजे सुनेनें, दत्तक घे- तला. तेव्हां असा ठराव झाला कीं, निमे इस्टेटीचें उत्पन्न सासून हयात आहे पर्यंत उप- भोगावें, व तिच्या पश्चात् तिचा नातू, ह्मणजे तिच्या सुनेनें घेतलेला दत्तक हा घेईल." ( ३०८. ) चुलत व पुतणे हे साधारण रीतीनें विभक्त झाले होते; परंतु कांही इस्टेट त्यांनीं तुकडे न पाडितां ठेविली होती. पुढे चुलता मरण पावला, तेव्हां त्याचा दाय घेण्याची अधिकारी त्याची विधवा व मुलगी असें ठरले. पुतण्या असतांही त्यास तो अधिकार नाहीं असा ठराव झाला. ३२ ( ३०९. ) एका हिंदु विधवेनें आपल्या सवतीवर निमे हिश्शाचा दावा केला, परंतु वादी ही व्यभिचारिणी असल्यावरून तिचा दावा रद्द झाला; व अशा बाबतीस सन १८५० चा आक्ट २१ हा लागू होत नाहीं; तो आक्ट धर्मीतरास मात्र लागू आहे, ह्मणून व्यभिचारिणी स्त्रीस दायाचा अधिकार नाही, हा धर्मशास्त्राचा ठराव कायम आहे, असा निर्णय झाला. 33 ( ३१०. ) एका गृहस्थास दोन मुलगे होते. ते बाप जिवंत असतांच विभक्त . ३०. बा० रि० वा० २१० ४४६. ३१. बा० रि० वा० २५० ४४३, ता० १५ जानेवारी सन १८२४. ३२. कलकत्ता सदर अदालतीचे निवडक रि० वा० ५ पृ० ३४९. ३३. कलकत्ता स० दि० अ० चे रि० सन० १८५८ सालचे, पृ० १८९१, मुं० हा० रि० वा १ पृ० ६६, व वा० ४ पृ० १५ अपील शाखा हे पहा. एक हिंदु व्यवस्थापत्र न करितां मरण पावला. त्याच्या पोटीं संतान नव्हते. त्याच्या पु ष्कळ विधवा होत्या. त्यांस सारखे हिस्से करून द्यावे आणि सर्वांस मिळून बहिवाट करण्याचें सर्टिफिकेट द्यावे; आणि जर त्यांतून कोणी सर्टिफिकिटास व्यभिचाराच्या सबबेनें अयोग्य आहे अशी तक्रार निघाली, तर तिची शाबिदी झाली पाहिजे असा ठराव झाला. मुं० हा० रि० वा० १ पृ० ६६.