पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. विधवेच्या नंतरच्या वारसाला तिची मुलंगी हयात असून पक्षकार केलेली नसली तरी. विधवेनें केलेली विक्री गैर आहे असे ठरविण्याचा दावा आणतां येतो. २ ( ३०१. ) एका विधवेत्रे आपल्या जांवयास नवऱ्याची स्थावर इस्टेट बक्षिस दिली.. ती इस्टेट एका सावकाराकडे गहाण होती. पुढे तो जांवई आणि बक्षिस देणार हीं मरण पावली. नंतर जांक्याच्या वारसांनी गहाण सोडविण्याचा दावा आणल्यावरून गहाणदार यानें हरकत घेतली. त्यावरून असा ठराव झाला कीं, बक्षिसपत्र देणारी विधवा मयत झाल्यामुळे नवयाच्या स्थावर जिंदगीचें बक्षिसपत्र पुढे चालणार नाहीं; परंतु दावा आणणार जांवयाची विधवा व तिचा पुत्र, हीं मूळ बक्षिस देणार हिचीं वारिस अशा सचबेनें त्यांनी वारिसपणाच्या नात्याने पाहिजे तर इस्टेट सोडविण्याचा नि- राळा दांवा आणावा, असा मुंबईच्या हायकोर्टाने ठराव केला आहे. २६ ( ३०२. ) कोणी हिंदु मयत झाला तेव्हां त्याचा समाईक इस्टेटींत अमुक हिस्सा आहे असे ठरून त्या हिश्शाचें उत्पन्न त्याला मिळत होतें, परंतु इस्टेटीचा तुकडा मात्र पडला नव्हता; ह्मणून अशा प्रसंगी मयताच्या विधवेस त्याच्या हिशापुरता तुकडा पाडून मागण्याचा अधिकार आहे, असा ठराव झाला आहे. १७ ( ३०३.) जर कोणी हिंदूनें हयात असतां कांही स्वसंपादित इस्टेट त्याच्या स्त्रीस बक्षिस दिलें असेल, तर सदरहू स्थावर इस्टेटींची पाहिजे तशी विल्हेवाट करण्याचा तिला अधिकार आहे: ( आग्रा सदर दिवाणी अदालतीचे रिपोर्ट सन १८५९ चे, पृ० ६३. ) • ( ३०४. ) एक निपुत्रिक हिंदु मरण पावला असतां, त्याच्या भावानें त्याची इस्टेट घेण्याविषयीं त्याच्या विधवेवर फिर्याद केली. पुढे चौकशीत असे समजलें कीं, मयत हा आपल्या भावापासून विभक्त होता. त्यावरून विधवा ही मयताची योग्य वारीस ठरून त्याप्रमाणे ठराव होऊन, वादीचा दावा रद्द झाला. २८ ( ३०५.) मृताच्या अनेक स्त्रिया असतील तर त्यांनी नवऱ्याची जिंदगी यथा. विभाग वांटून घ्यावी." परंतु त्यांस हिस्से पाडतां येतील असे दिसत नाही. त्यांनी पा २५. रघुपति वि० तिरूमलै इं० ला० रि० १५.म० ४२२. .२६. मुं० हा० ठराव स्पे० अ० नं० २३२ सन १८६६ ता० २२ आगष्ट १८६६. २७. मुंबई हा० रि० वा० १ पृ० १८९; स्पे० अ० नं० ४० सन १८६४. २८. बा० रि० वा० १ ले पृ० २४१ ता० २४६, कज्जा नं० ५१. ३९. व्य० म० भा० भा० २ पृ० १९३. मा० डा० १ पृ० ३१३ क ६२. भगवानदीन वि० मैनाबाई ११ मू० इं० अ० ४८७; ३ म० ह्रा० को० रि० ४२४; व ला० रि० ४ ई० अ० २१२.