पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'हिन्दुधर्मशास्त्र. २० "मृत्युपत्रानें विल्हेवाट करता येत नाही असा ठराव मिताक्षरेप्रमाणे झाला व तिची कायदेशीर विल्हेवाट जर ती करणार नाहीं तर ती जंगम मिळकत तिच्या नंतरच्या बापाच्या वारसांकडे जाते. हाच नियम मुलाची जंगम इस्टेट घेणाऱ्या आईसही लागू आहे. ती इस्टेट त्याच्या कर्जाबद्दल जबाबदार होत नाही. परंतु स्थावराविषयीं मात्र तिचा अधिकार नियमित आहे, असा मुंबईच्या हायकोर्टाने ठराव " केला आहे. २१ २२ ( ३ ० ०. ) असें आहे, तथापि जरं विधवेनें स्थावर मालाची विक्री केली असेल, आणि ती विक्री करणारी विधवा जर हयात असेल, तर तिच्या हयातीपर्यंत तो विक्री कायम राहील. मग ती विक्री योग्य सबबेनें झाली असो किंवा नसो. तसेच जरी तिनें मिळकत गहाण दिली असेल, तरी ती ताहांहयातच गहाण मिळकत चालेल. २४ अशा इस्टेटीची कोणी विधवेनें केलेली विक्री किंवा गहाण योग्य कारणासाठी नसेल तर तिच्या पश्चात् नवऱ्याचे वारस तो व्यवहार रद्द करूं शकतील. मद्रासेस असे ठरले आहे की, १९. गदाधर भट वि० चंद्रभागाभाई ई० ला० रि० १७ मुं० ६९०. २०. हरीलाल वि० प्राणवल्लभदास इं० ला० रि० १६ मुं० २२९. २१. बाई जमना वि० भाईशंकर इं० ला० रि० १६ मुं० २३३. प्र० ६ आहे. ' १९ २२. स्पे० अ० नं० ३०.३ स० १८६३ बेचर भगवान अपिलेन्ट वि. बाई लखभी रिस्पोंडेंट, मुंबई हा० रि० वा० १ पृ० ५६; व शिवाय सदर्लंड्स् वी० रि० ५ पृ० १४१ तागाईत १४४: अ० नं० ३१९, ३५४ व ३५५ सन १८६५ यांतही असाच ठराव झाला आहे, व हिंदुस्थान सरकारच्या प्रामि- सरी लोन नोटी ह्या जंगम माल होत ह्मणून 'विधवेने त्यांची पाहिजे तशी विल्हेवाट करण्यास तिला पूर्ण अधिकार आहे. . २३. मुंबई हा० को० रि० वा० २ पृ० ३३१ ता० ३३४: स्पे० अ० नं० ४४६ सन १८६५, म- याराम भाईराम अ० वि. मोतीराम गोविंदराम रि; सदर्लंडस वीक्की रि० वा० ६ पृ० ३६ स्पे० अ० नं० १५२ सन १८६६;-व सदर्लंड्स् वी० रि० वा० १ लें पृ० ४७ स्पें० अ० नं० ९२७ सन १८६४. २४. मुंबई एथील हा० कोटीचें स्पे० अ० नं० ४५७ सन १८६६ यांत सुभानराम स्पे० अ० वि. टिपव्वा स्पे० रि० यांस प्र० चादी ठिपव्वा इर्णे चादी सुभानराव यास एक शेत गहाण दिलें तें ताब्यांत घेण्याविषयीं वादीनें अर्ज केला. तें प्र० वादीनें कबूल केले; परंतु दुसऱ्या प्र० वादीने तक्रार केली की, टिपव्वा ही माझ्या मयत भावाची विधवा आहे सबब तिला मिळकत दुसऱ्यांस देण्यास अधिकार नाहीं. मुनसिफ़ानें वादीचा दावा रद्द केला. अपिलांत जज्जानें मुनसिफाचा निवाडा कायम केला. त्यावर स्पेशल अपिलांत हायकोटीनें असा ठराव केला की, स्पे० अपिलेंट ज़े घर व शेत ताब्यांत करून मागतो, ते स्पे० रि० टिपव्वा इच्या उदरनिर्वाहार्थ दिलेलें होतें सबब तिनें जी व्यवस्था केली ती बरोबर केली, व तर्से करण्यास तिला तांहाहयात अधिकार आहे. सबब दोही कोटांचे निवाडे रद्द करून स्पे० अ० टाच्या तात्र्यांत मिळकत देण्याविषयी ठराव केला.