पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. १९३ नसेल, तर नंगम धनाची मात्र ती मालक होते, आणि कन्या असेल तर स्थावरही घेते. [ हिकडे असा आचार आढळत नाहीं.] ( २९६.) पत्नी पतिव्रताधर्मानें वागणारी असेल तरच ती जिंदगीची मालक होईल; आणि व्यभिचारिणी असेल, तर तिच्या उदरनिर्वाहापुरतें मात्र तिला द्रव्य मिळेल.' १६ नाच, ( २९७.) वारशानें मिळालेली नवऱ्याची जिंदगी गहाण वगैरे ठेवण्यास पत्नी अधिकारी आहे; परंतु जर धर्मकार्यासाठी गहाण ठेवील तर मात्र अधिकारी आहे. तमाशे वगैरे वाईट कामांकरितां जर ती गहाण वगैरे ठेवील, तर तिला अधिकार नाहीं." परंतु बंगाल हायकोर्टाने ठराव केला आहे की, एकंदा वारसा मिळाल्यावर ती मुखत्यार आहे. परंतु ह्यांत पंडितांच्या जबान्यांचा योग्य विचार झालेला दिसत नाहीं: (केरी कोलिटाणी वि० मणीराम कोलिटा: बं० ला० रि० वा० १३ पृ० १; स० वी० रि० वा० १९ पृ० ३६७; ला० रि० ७ इं० अ० ११५ व इं० ला० रि० ९क० ७७५ ). शिवाय पहा निहालो किसन वि० किसनलाल, इं० ला० रि० अला० वा० २ पृ० १५०; होनम्मा वि० तिमणभट, इं० ला० रि० मुं० वा० १ पृ० ५५९. नवऱ्याची इस्टेट घेतल्यानंतर जर ती पुनर्विवाह करील तर तो वारसा १८५६ चा आक्ट १५ क० २ प्रमाणे जातोः ( मतंगिनीगुप्त वि० रामरतन इं० ला० रि० १९ क० २८९ ) . परंतु इं. ला. रि. ११ अ. ३३० पहा. ह्यांत पुनर्विवाहाचा रिवाज जा- तीत होता ह्मणून इष्टेट राहते असे ठरले. परंतु ( २९८.) याप्रमाणें जी विधवेची मालकी आहे, ती जरी पूर्ण सत्तात्मक नाहीं तथापि विधवा ही केवळ तांहाहयात उपभोगणारी असेंही ह्मणवत नाहीं; कारण तिला कित्येक कारणांसाठी स्थावर जिंदगी फ्रोक्त करण्याचाही अधिकार आहे. यास्तव नि- यमित रीतीनें उपभोग करील तर तिला सर्व स्थावर इस्टेटीचा उपयोग करण्याचा, व समयीं योग्य कारणासाठी दुसन्यास देण्याचाही अधिकार आहे." अनेक विधवा असतील तर एकीलाच विल्हेवाट करण्याचा अधिकार नाहीं.' १८ १८अ ( २९९.) कोणी निपुत्रिक हिंदूच्या विधवेला त्याच्या दायाचा अधिकार मि- ळाला असतां, ती त्याच्या सर्व जंगम मिळकतीची मालक होते. परंतु त्याची १५. व्य० म० भ० भा० २ पृ० १९०. जिला कन्या नसेल तिच्या हयातीपर्यंत ती स्थावराची मालक वर सांगितल्याप्रमाणे होय. १६. व्य० म० भा० भा० २ पृ० १९०. १७. व्य० म० भा० भा० २.१० १९०-९१. १८. मा० डै० वा० १ ले पृ० ३११ क० ४८-४९-५०-५१, व पृ० ३१२ क० ५२ तागाईत ५७ यांतील सर्व निवाडे पहा. १८ अ. वासुदेव वि० विजयानगरची राणी ला. रि. १९ इं. अ. परंतु हयातीपुरती करता येईल इं. ला. रि. ९ क. ५८०; परंतु इं. ला. रि. २ म. १७४ व ११ म. ३०४ पहा. २५