पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. ( २९३. ) जरी कोणतेंही हिंदु कुटुंब एकत्र असले, आणि त्यांतून कोणी एका पुरुषानें जर कांहीं मिळकत स्वतः संपादन केली असून तो मरण पावला, तर जरी बापाच्या मिळकतीचा वारसा त्याच्या दुसऱ्या दायादांस मिळाला, तरी ती स्व- संपादित इस्टेट मयताच्या विधवेस मिळेल, कारण स्वसंपादित इस्टेटीस ती वारस आहे असें ठरलें आहे. ( मूर्स इं० अ० वा० ९ १० १३९. ) १४ १९२ ( २९४. ) याप्रमाणे विधवेला अधिकार दिलेला आहे तरी त्याचें स्वरूप फार नियत आहे. मूळ ग्रंथात त्याविषयीं स्वालीं लिहिल्याप्रमाणे लिहिलेलें आहे. ( २९५. ) पुत्र, पौत्र, व प्रपौत्र, यांच्या अभावीं विभक्त व असंसृष्ट याची पत्नी स्थावर व जंगम अशा जिंदगीची मालक होते. परंतु जर तीस कन्या प्रतिवादी रमाबाईनें तक्रार केली नाहीं. प्रतिवादी शिधरामप्पा याणे तक्रार केली कीं, रमाबाई ही माझी आजी असून, ती माझ्या मातुश्रीच्या मरणानंतर वतनाची कांहीं दिवस बहिवाट करीत होती. तिर्ने वतन गहाण दिलें, तें देण्यास तिला अधिकार नव्हता सबब तिच्या कर्जाचा मी जबाबदार नाही. धारवाडच्या प्रि० स० अमीनाने ठराव केला की, प्रतिवादी शिधरामप्पा यास प्रतिवादी रमा- बाईची सून लक्ष्मीबाई हिनें दत्तक घेतला. लक्ष्मीबाई व रमाबाई यांचा वतनाच्या बहिवाटीविषयीं तंटा होऊन त्यांत लक्ष्मीबाई वहिवाटदार ठरली. पुढे ती मरण पावली त्या वेळेस वतन सरकारांत जप्त झालें. तें प्रतिवादी रमाबाईनें बादी याजपासून कर्ज काढून शिरस्त्याप्रमाणे सरकारांत नजराणा भरून सोडविलें, आणि कलेक्टर साहेबांकडून वतनाची वहिवाट करण्याविषयीं हुकूम घेतला. सदरहू वतन प्रतिवादी रमाबाईनें कर्जाबद्दल वादीस गहाण लावून दिलें, ते त्याच्या कचजांत ४ वर्षे होतें. नंतर प्रतिवादी शिधरामप्पा यानें आपला हक्क शाबीत करून ते वतनं प्रतिवादी रमाबाईकडून काढवून आपल्या कब- जांत घेतले, त्यावरून वादी यानें हा दावा केला. रमाबाईनें वतन सोडविण्याकरितां वादीचें कर्ज काढिलें, याजकरितां जरी कर्जाबद्दल वतन जप्त होत नाहीं, तरी रमाबाईच्या वारिसांनीं तें फेडलें पा• हिजे, सबब प्रतिवादी शिधरामप्पा यानें रमाबाईची जी जिंदगी त्याच्या ताब्यांत असेल, तींतून वादीचे रुपये द्यावे. यावर अपिलांत धारवाडच्या जज्जानें प्रतिवादी रमाबाईला वतन गहाण टाकण्यास अधिकार नव्हता. असें ठरवून प्रि० स० अमीनाचा निवाडा फिरविला. स्पे० अपिलांत मुंबई हायकोर्टाचा ठराव:- आमचा अभिप्राय असा आहे की, रमाबाईला नजराण्याचे रुपये भरण्याकरितां कर्ज काढण्यास अधिकार होता, व त्या कर्जाची वतनांतून फेड होणे हे बरोबर आहे. याकरितां आह्मी जंज्जाचा निवाडा फिरवून प्रि० स० अमीन यांचा निवाडा खर्चसुद्धां कायम ठेवितों. [ ता० २१ मार्च सन १८६८]. १४. हा कज्जा मद्रास इलाख्यांतील आहे, तथापि याचा फडशा मिताक्षरेच्या आधारानें झालेला आहे; ह्मणून मुंबई इलाख्यांतही त्याप्रमाणे इनसाफ होण्यास कांही अडचण दिसत नाहीं.