पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १९१ व्यंकटाच्या बापानें सारा वारण्याकरितां व दुसन्या खर्चाकरितां कर्ज दिलें होतं. त्याचा निवाडा झाल्यावरून तिची इस्टेट विकण्याचा हुकुम झाला. दरम्यान त्या विधवेने आपल्या इस्टेटींतून सदरहू ऐवज फिटण्याचा बंदोबस्त करून फेडीस इस्टेट लावून दिली. ते कर्ज फिटण्याच्या पूर्वी सदरहू विधवा मरण पावली. तेव्हां बेवारशी माल आहे अशा सचबेनें कलेक्टर यानें तो माल जप्त केला. पुढे गाहाणंदार यानें अर्ज केल्यावरून सदर दिवाणी अदालतीच्या हुकुमावरून पूर्वीचा निवाडा बजावून जमीनदार याची मिळकत त्याच्या ताब्यांत देवविली. नंतर कलेक्टर यानें सदरहू मिळकत बेवारसपणाच्या सबबीनें सरकारची झाली ती आपल्या ताब्यांत देववावी ह्मणून अव्वल दावा आणिला. तेव्हां सदरहू इस्टेट विधवेच्या नवऱ्याची असल्यामुळे त्या इस्टेटीची विल्हेवाट करण्याचा अधिकार तिला किती होता याविषयीं तकरार पडली. शेवटीं असा निर्णय झाला कीं, विधवा नवऱ्याची जी इ- स्टेट घेते त्या इस्टेटीवर तिची सत्ता नियमीत आहे. आपल्या नवऱ्याच्या सद्गतीकरितां धर्मसंबंधीं व इतर कृत्यें जी करण्याविषयी लिहिलेले आहे, ती करण्याकरितां व संसाराक- रितां इस्टेटीची विल्हेवाट करण्याचा तिला अधिकार आहे: ( मूर्स इं० अ० वा० ८ पृ० ५२९. ) ( २९१.) दुसऱ्या एका कज्जांत एका अज्ञानाच्या विधवा आईनें आपल्या नव- ज्याचें कांहीं कर्ज देण्याकरितां आणि कांही आपण इस्टेटीची वहिवाट करीत असतां केलेले कर्ज देण्याकरितां कर्ज काढून खत लिहून दिलें होतें. त्या खताचा बोजा तिच्या नवऱ्याच्या झणजे अज्ञानाच्या बापाच्या इस्टेटीवर आहे असा ठराव झालाः ( मूर्स इं० अ० वा० ८ पृ० ३१९. ) ( २९२. ) त्याचप्रमाणें हनुमान प्रसाद पण्डे याच्या प्रख्यात कज्जामध्ये असा ठराव झाला आहे कीं, वर सांगितल्या प्रसंगी कोणी हिंदु विधवा इस्टेटीच्या फायद्याक- रितां कर्ज करील आणि तिला इमानानें कोणी सावकार रुपये देईल, तर त्या रुपयांचा बोजा इस्टेटीवर पडून, तें कर्ज द्यावें लागेल: 3 ( मूर्स इं० अ० वा० ६ पृ० ३९३ ). १३ १३. याच कज्जाच्या आधारावरून स्पे० अ० नं० ४४ सन १८६७ याचा फैसला झाला तो येणेप्रमाणे :- बादी व्यंकटराव देशपांडे यानें फिर्याद केली कीं, प्रतिवादी रमाबाई हिनें मजपासून कर्ज घेऊन खत लिहून दिलें, त्याप्रमाणे माझे व्याजसुद्धां ३१०४१ रु०, ५ आ०, ५ पै, एकंदर येणें. पैकीं ६७०० रु०, २ आ०, ३ पै, मला पोंचले ते वजा जाऊन बाकी २४३४१ रु०, ३ आ०, २ पै फिरतात देववावे. प्रतिवादी रमाबाईनें गहाण लिहून दिलेली जमीन शिधरामप्पा याच्या कबजांत असल्याकार- जानें वादीने त्यास फिर्यादीत सामील केलें.