पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ वारिसांतील वारीस नसेल, तर त्याचें धन राजा घेईल, आणि वरील कलमाच्या टीपे- वरून तोच नियम ब्राह्मणास आतां लागू होईल. ' ९ ( २८६.) संन्यासी व ब्रह्मचारी यांची जिंदगी शिष्य व एकतीर्थी धर्मभ्राता हे क्रमानें घेतील. [एकतीर्थी धर्मभ्राता ह्मणजे धर्मार्थ मानिलेला भाऊ असा असून ज्याचा ब्रह्मचर्यादि आश्रमही समान असा जो पुरुष तो.] (२८७.) आतां पत्नी आदिकरून दायादांस जो दाय मिळतो, त्यास सप्रतिबंध ह्मणजे अटकाविलेला दाय असें ह्मणतात. हा दाय जेथें मयताच्या मागें पुत्र, पौत्र व प्रपौत्र, यांतून कोणीही नसतो, तेव्हां प्राप्त होतो." व असा दाय प्राप्त होण्यास तो मयत मनुष्य विभक्त झालेला असून असंसृष्ट असला पाहिजे." ज्याला धन वारशानें मिळण्याचा समय येतो तेव्हां तो जर उन्मत्त किंवा वेडा असेल तर त्याचा हक्क जातो. १२ ( २८८.) वर सांगितल्याप्रमाणें निपुत्रिकाच्या मरणानंतर त्याची विधवा वारीस होते. विधवेला जो वारसा मिळतो त्याचें स्वरूप काय आहे ह्मणजे तिला त्या वार- साच्या योगानें मयताच्या मालमिळकतीमध्ये किती स्वत्व प्राप्त होतें, याविषयीं पुष्कळ वादविवाद झाला आहे त्याचें स्वरूप पुढील विवरणावरून वाचकांच्या लक्षांत येईल. विधवेच्या हक्कांविषयीं. ( २८९.) विधवा ही मयताच्या इतर दायादांची ट्रस्टी ह्म० जामीनदार अथवा हमीदार आहे, ह्मणून मयताच्या इस्टेटीवरील तिची सत्ता नियमित आहे असा साधा- रण अभिप्राय आहे; परंतु हे मत केवळ एकपक्षी आहे असे दिसतें. आणि ती केवळ ट्रस्टी ह्मणजे हमीदार नाहीं असा प्रिव्ही कौन्सिलानें हरिदासदत्त वि. श्री- मति अपूर्णदासी व दुसरा, या कज्जामध्ये ठराव केला आहे ( मू० इं० अ० वा० ६ पृ० ४३३ ). (२९०.) त्यानंतर पुढें मच्छलीपट्टणचा कलेक्टर वि. कवाली व्यंकटनारा- यणअप्पा, या कज्जाचा तपास सन १८६१ सालीं झाला. त्यांत अशी हकीकत होती कीं, मच्छलीपट्टण जिल्ह्यांत एक निरंतर चालण्याची कौली जमीनदारी इस्टेट एका ब्राह्मणाची होती. तो निपुत्रिक मरण पावला, व त्यानें व त्याच्या विधवेनें दत्तक- ही घेतला नव्हता. पुढे त्याची विधवा इस्टेट वहिवाटीत असतां, तिला कवाली ९. मि० भा० पृ० २३०. १०.. मि० भा० पृ० २१४-२१५. ११. व्य० म० भा० भाग २ पृ० १८१. १२. १३ मू० इं० अ० ५१९ (६ बं० ला० रि० ५०९ प्रि० कौ० ) - -