पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. परिच्छेद २ रा. वारसा इत्यादि. ( २८०. ) आतां कोणी पुरुष मेला, अथवा संन्यस्त झाला, अथवा १२, १५, किंवा २० वर्षे प्रवासास जाऊन त्याची वार्ताच लागली नाहीं,' तर त्याच्या द्रव्याची व्यवस्था साधारणतः कशी होते याचा आणखी विचार करूं. पूर्वी दाय ह्मणजे काय बदायविभागाचे काल, व पितापुत्र यांचे हिस्से कसे होतात, याचें थोडेंसें वर्णन केलें. ( २८१ ) सांप्रत कोणी पुरुषाच्या मरणानंतर, अथवा दुसरे दोन प्रकार वर सांगितले तसे झाले असतां, त्याच्या जिंदगीचा वारसा कसा व कोणास मिळतो त्याचा विचार करूं. असा वारसा अनुक्रमानें खालीं लिहिल्याप्रमाणे दायादांस मिळतो' :- 11 अप्रतिबंध वारिस. पुत्र, पौत्र ह्म० नातू, प्रपौत्र ह्म० पणतू. सप्रतिबंध वारिस. पत्नी, कन्या, दौहित्र (ह्म० मुलीचा मुलगा. ) आई ( गुजराथेंत आईच्या अगोदर बाप येतो. ) बाप, भ्राता, भ्रातृपुत्र, १. निर्णयसिंधु, अशौचप्रकरण, प० २५ पृ० १ पं० १-२, हे पहा; पूर्ववय असल्यास २० वर्षे, मध्यवय असल्यास १५ वर्षे, व उत्तरवय असल्यास १२ वर्षे वाट पाहून पुढे क्रिया करावी, अर्से घटलेले आहे. २. मि० भा० पृ० २२८ व २२९ व यावरील सुबोधिनी टीका पहा. बंगाल्यांत जो नजीकचा श्राद्धकर्ता तो अगोदर येतो. १२ मू० इं० अ० ८१. इकडील क्रम तसा नाही हे सांगणे नलगे.