पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६. दायविभाग. १८६ २१७ २१८ २३९ २२. तेव्हां जेन्हां तो खर्च करतो तेव्हांपासून हिस्सेरशीच्या दाव्याला हक्क व मुदत सुरू होतात.”* विधवेच्या नंतरचा वारिस तिच्या कर्जाबद्दल जबाबदार होण्यास तिनें त्याच्या इस्टेटीवर बोजा टाकला पाहिजे. "" चुलत्यानें वहिवाटदार या नात्याने व्यापारांत केलेल्या कर्जाबद्दल सर्वांची इस्टेट जाते. जप्ती झालेली असेल तर मग ऋणकोची (मृतं बा पाची) इस्टेट नाहीं अशी मुलांची तक्रार चालावयाची नाहीं; मग हुकुमनामा एकट्या बा पावरच असला तरी हरकत नाहीं. एका वादीला कांहीं हिशेबाची बाकी देणें होती. त्याच्यावर तीबद्दल हुकुमनामा झाला होता. नुलगे त्याबद्दल जबाबदार ठरले गेले. समाईक कुटुंबाच्या वहिवाटदारावर जेव्हां कर्जाबद्दल फिर्याद होते तेव्हां व कुटुंबांतील त्याचा हक्क संबंध जेव्हां हुकुमनाम्याच्या बजावणीत विकला जातो तेव्हां लिलांव विकत घेणाऱ्याला किती मिळालें हें ठरवितांना इतकेंच पहावयाचें कीं, सर्व इस्टेट विकता येईल असें कर्ज होते किंवा नाहीं, व विकत घेणाऱ्यानें वस्तुतः सर्व इस्टेट घेण्याच्या इराद्यानें किंमत देऊन घेतली किंवा नाहीं. २” वहिवाटदाराने काढलेले कर्ज कुटुंबाच्या गरजेसा- ठींच काढले आहे, असें गृहीत होत नाहीं. विभागाच्या वेळेस पूर्वीच्या वहिवाटदारानें एक देणें छपवून ठेवलें होतें. नंतर सर्वांवर त्याबद्दल फिर्याद झाली तेव्हां हायकोर्टाचा ठराव झाला की, तें कर्ज जरूरीसाठी अगर कुटुंबाच्या फायद्यासाठी काढलेलें होतें की काय, व ज्या वेळेला कर्ज ताजें करून घेतले त्यावेळेस वहिवाटदार या नात्याचा त्याचा अधिकार वांटपामुळे सरला होता है वादीला प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीनें माहीत होतें की काय, हें ठरविले पाहिजे. २२३ २२२ ● २२३ साधारण रीत्या मयत झालेल्या अविभक्त हिस्सेदाराच्या स्वतःकरितां काढिलेल्या कर्जाच्या फेडीकरितां त्या कुटुंबांतील पाठीमागे उरलेल्या हिस्सेदारांचे हातांत अ- सलेली समाईक जिंदगी बांधली जात नाहीं; कारण त्यांच्याकडे ती जाते व त्यावर २१६. अघोरनाथ वि. गिरीशचंद्र इं. ला. रि. २० क. १८. २१७. कामेश्वर प्रसाद वि० राजकुमारी इं० ला० रि० २० क० ७९. २१८. शिवप्रसादसिंह वि० साहेबलाल इं० ला० रि० २० क० ४५३. राजकुमारलाल वि० साहेबलाल इं० ला० रि० २० क० ४५३. २१९. वेणीप्रसाद वि० पार्वतीकुवर इं० ला० रि० २० क० ८९५. २२०. नाटसयन वि० पौन्तुसामी इं० ला० रि० १६ म० ९९. २२१. जानकीबाई वि० महादेव इं० ला० रि० १८ मुं० १४७. २२२. सोयरू पद्मनाभ वि० नारायणराव इं० ला० रि० १८ मुं० ५२०. २२३. भास्कर वि. तुळशीदास मुं० हा० को• छा० ठ. १८९४. पृ० ५८.. दिनमयी वि० रायलक्ष्मीपति ला० रि० ७ इं० अ० ८ पहा. २४