पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ हिन्दुधर्मशास्त्र. २३१ २१२ मुद्याची आहे. ‘ ऋणकोचा हक्क व भाग ' हे शब्द संदिग्ध आहेत. त्यांचा अर्थ, विभाग झाला असतां त्याला जितका भाग मिळू शकेल तितका, अथवा आपले कर्ज फे- डण्यासाठी जितकें तो विकूं शकेल तितका, असा होऊं शकेल. प्रत्येक कज्जांत कोर्टाचा जाहीर लिलांवानें किती विकावयाचा उद्देश होता, व विकत घेणाऱ्यांना किती विकत घेण्याची आशा होती, हा एक कायद्याचा व वस्तुस्थितीचा मिश्र प्रश्न उद्भवतो. कायदा परवानगी देतो त्याच्या पेक्षां कोर्ट जास्त विकूं शकत नाहीं. विकूं शकेल त्यापेक्षां कमी विकण्याचा कोर्टाचा उद्देश होता असे दिसून येईल, अथवा त्याने विकावें त्यापेक्षां कमी विकलें असे जर दिसून येईल, व हें जर विकत घेणाऱ्यांना माहीत होतें असे दिसेल तर, वास्तविक जितकें विकण्यासाठी ठेविलेलें होतें त्यापेक्षा जास्त विकले जाणार नाहीं. ( आवृत्ति ५ वी पृ० ३४५–३४६ ). २१३ (२७९.) जेथें फक्त नियमित भागच गेला असे दाखवितां येत नाहीं, मग गहाणावरील हुकुमनाम्यानें विक्री असो, अगर साध्या कर्जखतामुळे असो. तेथें सर्व इस्टेट विकली गेली असे गृहीत धरले असतां हरकत नाहीं. अविभक्त कुटुंबामध्ये मुलगे बापाच्या स्वतःच्या पूर्वीच्या गहाणाबद्दल (जें दुराचारासाठीं नाहीं अशा ) त्याच्या हयातीत त्याच्याबरोबर फिर्यादीला पात्र होतात. कर्जखत त्याच्या स्वतःच्या नांवाचं असून, कर्ज त्यांच्या संमतीनें केलेलें नसले तरी, अथवा कुटुंबाच्या गरजेसाठी नसले तरी, हरकत नाहीं. हुकुमनामा १८८२ चा आक्ट ४, क. ८८ प्रमाणे गहाण इस्टेटीच्या विक्रीचा असावा. अविभक्त कुटुंबाच्या वहिवाटदाराला त्यानें केलेल्या योग्य कर्जाची कबुली करण्याचा अधिकार आहे व तिनें नवी मुदत सुरू होते. तो मुदतीच्या कायद्याच्या १९ कलमाखाली एजंट होतो. २१५ जेव्हां वहिवाटदारानें जातीनें जरूरीसाठी कर्ज काढले २१४ २११. दीनदयाळ वि. जगदीप नारायण ला. रि. ४ इं. अ. २४७. हरदेव नारायण वि. रुद्रप्रकाश ला. रि. ११ इं. अ. २६. नानोमी बाबु आसीन वि. मदनमोहन ला. रि. १३ इं. अ. १. २१२. १७ ला. रि. अ. ई १६ इं ला. रि. ८ मुँ ४८६,४ म ६५. २१३. नानोमी बाबू आसीन वि. मदनमोहन ला रि. २३ इं. अ. १. शंभूनाथ वि. गुलाबसिंह ला. रि. १४ इं. अ. ७७, पेदाची चेटी वि. सांगिलीवीर ला. रि १४ इं. अ. ८४. मेमसिंह वि. प्रतापसिंह इं. ला. रि. १४ अ. १७९. महमद हुसेन वि. दीपचंद इं. ला. रि. १४ अ. १९०. २१४. बंदीप्रसाद वि. मदनलाल इं. ला. रि. १५ अ. ७५. खत्रीलाल वि. गोविंदप्रसाद इं. ला. रि. २० क. ३२८. २१५. चिन्नय्या वि. गुरुनाथ इं. ला. रि. ५ म. १६९. भास्कर तात्या शेटे वि. विजलाल इ. ला. रि. १७ मुं.. ५१२.