पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १८३ २०६ जर बा- च्या हातांत इस्टेट आली ह्मणजे स्वतंत्र फिर्याद आणली पाहिजे. बापावर मिळवि- लेल्या हुकुमनाम्याची बजावणी पुरे होत नाहीं. परंतु त्याच्या हयातीत जप्ती झाली असेल तर बस होईल. ज्यांच्या हातांत इस्टेट जाते ते जबाबदार होतात. सावकारांना बुडिवण्यासाठी इस्टेट बक्षीस दिलेली नसेल तर ती कायम राहील. पाच्या कर्जासाठी बापाचाच हिस्सा जप्त करता येतो, अथवा सर्व इस्टेट जप्त करता येते ह्या- बद्दल अनेक ठरावांत चर्चा झाली आहे. त्या सर्वांचा उल्लेख न करतां त्यावरून मि० मेन यांनी आपल्या ग्रंथांत जे सिद्धांत काढले आहेत त्यांचाच उल्लेख करतों. निवाड्यांपैकीं मु- ख्यांची नांवें दिली आहेत. २०५ २०८ २०१ (२७८.) मिताक्षरेप्रमाणें बापाला समाईक इष्टेटींतील आपलाच नव्हे तर आपल्या मुला- चेही हिस्से स्वतःच्या पूर्वीच्या कर्जासाठी विकतां अथवा गहाण टाकतां येतील. मात्र ते कर्ज गैरकायदा अथवा दुराचरणामुळे झालेले उपयोगाचें नाहीं, व हा व्यवहार फिर्यादीनें अ- थवा हुकुमनाम्याच्या बजावणीत, त्यांच्या विरुद्ध, ते पक्षकार नसतांही, अमलांत आणतां येतो. परंतु बापाला असे करण्याचा अधिकार आहे एवढ्यावरून त्यानें तसे केलेच आहे असे गृहीत होत नाहीं, व त्यानें असें केलें आहे असें जे ह्मणतील त्यांनीं, असें के- ल्याचे शब्द खतांत आहेत एवढेंच नव्हे तर ते शब्द तसे समजून खरेदी घेणारा त्यांत घालवील असे असले पाहिजेत. ०९ गैरकायदा अथवा दुराचरणामुळे झालेले नव्हे अशा बापाच्या स्वतःच्या जातकर्जाचा वसूल, धनको, बापाचे व मुलांचे सर्व हिस्से जप्त करून व विकून करूं शकेल, व मुलगे दाव्यांत, अथवा हुकुमनाम्याच्या बजावणीच्या कामांत, पक्षकार दा- खल असले पाहिजेतच अलें नाहीं. धनको असें करीत आहे हें दाव्याचे, अथवा हुकु- मनामा बजावण्याच्या कामाच्या स्वरूपावरून, अथवा विक्रीसाठी जाहीर केलेल्या इस्टेटीच्या वर्णनाच्या स्वरूपावरून दिसल्याशिवाय गृहीत धरले जाणार नाहीं; व मुलांना हुकुमनामा बजावण्याच्या कामांत पक्षकार केलेले नाही ही गोष्ट कोनें बापाच्या हिश्शापेक्षा जास्त अथवा तितकेंच मागितलें होतें ह्याचा विचार करतांना २१० धन- २०७ २०५. वेंकटराम वि. सेंथिवलु ई. ला रि. १३ म. २६५. २०६. इं. ला. रि. ३ म. ३५९ व म. ५८६. २०७. रायबिशनचंद वि. अश्मैदा कुवर इं. ला. रि. ६ अ. ५६०. ट्रान्सफर आफ प्रापर्टी आक्ट क. १२८ पहा. २०८. गिरधारीलाल वि. कांतोलाल ला. रि. १ इं. अ. ३२१. शिवाय इं. ला. रि. १७ मुं. ७१८ च १८ मुं. १४७ पहा. २०.९. शंभूनाथ वि. गुलाबसिंह ला. रि. १४. इं. अ. ७७. २१०. मदन ठाकूर वि. कांतोलाल ला. रि. १ इं. अ. ३२१. नानोभी बाबू आसीन वि. मदन मोहन ला. रि. १३ इं. अ, १.