पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १८१ केल्यावांचून बाकी राहिली असेल तितके मालमिळकतीपर्यंत व तींतून ते आदा करण्यास मात्र तो पात्र आहे. परंतु सदरहूप्रमाणे कबजांत घेतलेले मालमिळ- कतीचे कोणतेही भागाचा त्यानें योग्य रीतीनें खर्च केला नसेल तर तितके माल- मिळकतीचा त्यानें योग्य रीतीनें खर्च केला नसेल तितके मालमिळकतीपर्यंत सदरहू कर्जाबद्दल जातीने जबाबदार आहे असे समजावें. ६. अविभक्त हिंदु कुटुंबांतील जिवंत राहिलेला मनुष्य किंवा मनुष्य हल्लींचे चालू कायद्यावरून अविभक्त कुटुंबाचें जें कर्ज आदा करण्यास पात्र आहेत तसे प्रकारचें कर्ज आदा करण्याची कोणे मनुष्याकडे खाली लिहिलेल्या प्रकारची जबाबदारी असेल ह्मणजे अविभक्त हिंदु कुटुंबाचा जिवंत राहिलेला तो मनुष्य आहे ह्मणून किंवा जिवंत राहिलेले मनुष्यांपैकीं तो आहे ह्मणून त्याकडे जी जबाबदारी असेल त्या जबाबदारीची या आक्टांतील कोणतेही ठरावावरून इयत्ता होते किंवा तीस व्यत्यय येतो असे समजूं नये. या आक्टाचे ५ वे कलमांत ठराव केला आहे तो खेरीज आहे. " ७. या आक्टांतील “ कर्जे " या शब्दांत मयत हिंदु जिवंत असता तर जे दावे खुद्द त्यावर अमलात आणतां येते किंवा आले असते व ज्या दाव्यांबायद त्याचे वारशावर फिर्याद चालती त्या दाव्यांतून उत्पन्न होणारे सर्व जबाबदारीचा समावेश होतो असे समजावें आणि प्रकरणास अगर पूर्वीपार संबंधास विरोध न येईल तर जेथें शब्दाला एक वचन आहे तेथें बहुवचनाचाही समावेश होतो; आणि जेथें शब्दांना बहुवचन आहे तेथे एकवचनाचाही समावेश होतो आणि जेथें पुरुषवाचक शब्द आहे तेथें स्त्रीजातीचाही समावेश होतो असे समजावें. ८. हा आक्ट गव्हर्नर जनरल साहेबांनी मंजूर केल्याची गोष्ट मुंबईचे सरकारी ग्याझेटांत मुंबईचे गव्हर्नर साहेबांनी प्रसिद्ध केली, ह्मणजे हा आक्ट अमलांत येईल. ९. या आक्टास सर्व कारणांसाठी “ मुंबईचा सन १८६६ चा हिंदूचे वार- सांस कर्जातून मुक्त करण्याविषयीं आक्ट" असें नांव दिले आहे. (२७५.) आतां या आक्टावरून फक्त पुत्रत्वाच्या व नातूपणाच्यासंबंधानें मात्र जो कर्जाचा बोजा पडत असे तो दूर झाला; परंतु रिक्थाविषयीं वगैरे जे नियम आहेत त्यांत कांहीं विशेष फेरफार झालेला नाहीं. ह्मणूनच बापाच्या कर्जासाठी योग्य रीतीनें वडिलार्जित मिळकत विकली गेली तर मुलगा ती विक्री रद्द करण्यासाठी दावा आणूं शकत नाही असा ठराव मुंबई हायकोर्टानें केला आहे. हें कर्ज असें असावें त्याविषयीं १९९ १९९. नारायणाचार्य वि० नरसो कृष्ण इं. ला. रि. मु. व्हा. १ पा, २६२.