पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० हिन्दुधर्मशाल. प्र० ६ रण्यासाठी जी फिर्याद केली असेल व ज्या फिर्यादींत हा आक्ट अमलांत येण्यापूर्वी फैसला सांगितला नसेल त्या फिर्यादींत सदरहू प्रकारचें कर्ज शाबीत झाले असतां किंवा कबूल केलेले असतां वादीस प्रतिवादीवर हुकुमनामा मिळणें तो प्रतिवादीच्या जातींवर मिळणार नाहीं; परंतु त्या मयत हिंदूचा तो वारीस आहे या नात्याने मात्र त्यावर हुकुमनामा मिळेल आणि हुकुमनामा पैक्याविषयी असल्यास तो पैका त्या मयत हिंदूचे मालमिळकतींतून देण्याविषयीं हुकूम करावा. आणि तसे तऱ्हेचे हुकुमनामे बजाविण्याविषयीं दिवाणी इनसाफाचें काम चालविण्याचे रीतीविषयी कायद्याचे २०३रे कलमांत जी रीत सांगितली आहे त्या रीतीनें तो हुकुमनामा बजाविण्याचा अधि- कार आहे. आणि ज्या फिर्यादीस या कलमांतील ठराव लागू असतील त्या फिर्या- दीचे खर्चाविषयीं हुकुमनामा करणारे कोर्टानें हुकूम करणें तो हा आक्ट अमलांत येण्यापूर्वी त्या मुकदम्यांत हुकुमनामा झाला असता तर ज्या रीतीने करण्यांत येता त्या रीतीने करावा. ४. ज्या मनुष्यानें हिंदु विधवेशी लग्न केले असेल तो केवळ त्या लग्नाचेच सबवेनें त्या विधवेचे पूर्वीचे कोणतेही मयत भ्रताराचे कर्जावद्दल जबाबदार होतो असे समजूं नये. आणि हा आक्ट अमलांत येईल त्या वेळी जी फिर्याद चालू असेल व जी फि- र्याद सदरहू प्रकारचे हिंदु विधवेशी लग्न केल्याचेच केवळ सबवेने सदरहू प्रकारचे कर्जा- बाबद सदरहू प्रकारचे मनुष्यास जबाबदार करण्यासाठी केली असेल व ज्या फिर्या- दींत हा आक्ट अमलांत येण्यापूर्वी फैसला सांगितला नसेल त्या फिर्यादीत जो प्रति- वादी असेल त्यानें या कलमांतील ठरावाप्रमाणे जबाब पाहिजे तर द्यावा. आणि ज्या फिर्यादीस या कलमांतील ठराव लागू असतील त्या फिर्यादीचे खर्चाविषय हुकुमनामा करणारे कोर्टानें हुकूम करणें तो हा आक्ट अमलांत येण्यापूर्वी त्या फिर्यादींत झाला असता तर ज्या रीतीने करण्यांत येता त्या रीतीने करावा. ५. अविभक्त हिंदु कुटुंबांतील एका मनुष्याने किंवा अधिक मनुष्यांनी हा आक्ट अमलांत आल्यानंतर कर्ज केले असेल व ज्या कारणाकरितां तें केलें असेल त्या कारणावरून तें त्या अविभक्त कुटुंबाचें कर्ज ठरत असेल तेव्हां त्या अविभक्त कुटुं बांतील जो मनुष्य तें कर्ज करण्याचे वेळीं जन्मलेला नसेल किंवा एकवीस वर्षांहून कमी वयाचा असेल तो तें कर्ज आदा करण्यास जातीनें पात्र होतो असे समजूं नये, परंतु त्यानें किवा त्याचे हुकुमावरून किंवा त्याचे उपयोगासाठी इतर कोणी मनुष्यानें त्या अविभक्त हिंदु कुटुंबाचे जितके मालमिळकतीचा व त्या अविभक्त हिंदु कुटुंबां- तील कोणी मयत मनुष्य कर्ज करितेवेळी एकवीस वर्षांहून अधिक वयाचा असून त्याची कांही विभक्त मालमिळकत असल्यास तिचा कबजा घेतला असेल व जी खर्च