पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ हिन्दुधर्मशास्त्र प्र०६ तें जर पितामहाने कुळाकडून तारण घेतलें नसेल तर; परंतु जर असेल तर, नातवानेही तें कर्ज वारले पाहिजे. 1. ९६ कोणी जर कुळाकडून तारण घेऊन जामीन झाला असेल तर त्याच्या पुत्रानें, व त्याच्या अभावीं नातवानें, त्याच्या तारणांतून सावकाराचें कर्ज सव्याज दिले पाहिजे; परंतु बापाच्या किंवा पितामहाच्या जिंदगींतून ते मिळणार नाहीं.' १९७ . ( २७३.) मूळ कर्जदारावर दावा शाबीत केल्याशिवाय, जामिनावर शास्त्राप्र माणें दावा करतां येणार नाही असा ठराव ता० ६ नवेंबर १८१२ रोजी झाला आहे; व असा दावा नवऱ्याच्या जामिनकीच्या कर्जाबद्दल विधवेवर आणलेला त्याच वेळीं काढून टाकण्यांत आला आहे." आतां कराराच्या आक्टाचा भाग ८ पहावा. ( २७४.) सदरीं दायाचा प्रकार लिहिला आहे, आणि त्यांत पित्याचें किंवा पि तामहाचें कर्ज असल्यास त्याची वांटणी किंवा त्याचा बोजा कोणावर पडेल याचे विवेचन केलें आहे; त्या सर्व विषयास लागू पडणारा असा एक आक्ट, मुंबई येथील नामदार गव्हरनराच्या कौन्सिलानें सन १८६६ साली केला आहे. तो येणेंप्रमाणे:- मुंबईचा आक्ट नं० ७ सन १८६६- मुंबईचे गव्हरनर इन्कौन्सिलाचा खाली लिहिलेला आक्ट सन १८६६ चे एप्रिल महिन्याचे २८ वे तारिखेस मुंबईचे गव्हरनर साहेबांनी मंजूर केला व सन १८६६ चे मे महिन्याचे १५ वे तारिखेस गव्हरनर जनरल यांनीं मंजूर केला तो सर्वांस जाहीर होण्यासाठीं छापून प्रसिद्ध केला असेः- 66 मयत हिन्दूचे मुलाकडे किंवा नातवाकडे किंवा वारसाकडे त्याचे वडिलाचे क- कर्जाबाबद किती जबाबदारी आहे हें व हिंदू विधवेचे दुसरे भ्रताराकडे तिचे मयत भ्र- ताराचे कर्जाबाबद किती जबाबदारी आहे हे ठरविण्याविषयीं व रिणको व धनको या बाबदचा कायदा इतर रीतीनें सुधारण्याविषयी आक्ट. मुंबई येथील इनसाफाचें हायकोर्ट अव्वल दिवाणी फिर्यादी घेण्याची आपली मा- मूल हुकुमत चालवितांना हिंदूलोकांस चालू कायदा लागू करतें त्याप्रमाणे कोणी मनुष्य मयत हिंदूचा मुलगा किंवा नातू असल्याचेच मात्र सबबनें तो आपले वडिलाचे कजवि- पयीं जबाबदार होत नाहीं आणि मयत हिंदूचा ज्या मुलास किंवा नातवास किंवा इतर वा- रसास मयताची मालमिळकत मिळाली असेल तो मुलगा किंवा नातू किंवा वारस तितक्याच १९६. मि. भा० पृ. १०८. १९७. व्य. मयू. भा. २ रा पृ. १. १९८. बारोडेलचे रिपोर्ट, वा० १ पृ. ९३.