पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ जो जिंदगी घेणारा असेल त्यानें द्यावें. .१७७. जर नवऱ्याने प्रत्यक्ष कर्ज करण्याचा अधि- कार स्त्रीला दिला नसेल, अगर हकीगतीवरून तसा दिसून येत नसेल तर तो तिच्या कर्जाबद्दल जबाबदार नाही.' १४८ (२६ ४.) पित्याने केलेले कर्ज पुत्रांनी व त्याच्या अभावीं नातवांना द्यावें; पणतूंनीं देऊं नये. परंतु जर कर्ज फेडणारा पुत्र आहे तर त्याने त्याप्रमाणे सव्याज द्यावें, आणि नातू फेडणारा आहे तर तो मुद्दल मात्र देईल; व्याज देणार नाहीं.' १७९ ( २६ ५. ) पणज्याचें कर्ज देऊं नये; परंतु जर त्यास पणज्याचें द्रव्य मिळाले असेल तर त्याणें कर्ज दिले पाहिजे; आणि पुत्र व नातू यांस रिक्थ जरी मिळाले नसेल तरी ते कर्ज देण्याचे जोखमदार शास्त्रानें आहेत. परंतु आतां पुढील आक्ट पहावा. व १८० ( २६६.) बापाची जिंदगी मिळाली नसेल तरीही पुत्रानें त्याचें कर्ज दिलें पा- हिजे. परंतु त्याला त्याबद्दल परज मात्र करितां येणार नाहीं असा ठराव मुंबई सदर दिवाणी अदालतीनें ता० १३ मे १८२३ रोजी केला होता. १८१ तसाच बापापासून जिंदगी मिळाली नसतांही पुत्रानें कर्ज दिले पाहिजे असा मुंबई सदर दिवाणी अदालतीनें ठराव स्पे० अ० नं० २२६३ यांत ता० १६ अक्टोबर १८४७ रोजी केला होता. १८२ जरी पुत्रानें बापाचें कर्ज दिले पाहिजे असे शास्त्र आहे तरी बाप जिवंत असतां, मुलाच्या उदरपोषणार्थ जी पितामहार्जित जिंदगी मुलास दिली असेल तिजवर बापाच्या कर्जाचा निवाडा बजाविला जाणार नाहीं. १८३ ( २६७. ) नातवानें पितामहाचें कर्ज मुद्दल मात्र द्यावें असें जें सांगितलें तें जर त्याणें पितामहाचें रिक्थ घेतले नसेल तर समजावें; आणि जर रिक्थ घेतलें असेल तर पितामहांचे कर्ज नातवास सव्याज द्यावे लागेल. १८४ ( २६८.) जो ज्याची जिंदगी घेतो, त्याणें त्याचें ऋण फेडावें. आतां ऋणापेक्षां जिंदगी जरी कमी किंमतीची असेल तरी ती घेणाऱ्यानें जिंदगीच्या मालकाचें कर्ज फेडि- १७७. मि. भा. पु. ९४. १७८. पुशी वि० महादेव इं० ला० रि० ३ अ० १२२. १७९. मि. भा. पृ. ९९. १८०. मि. पृ. ९९ पृ. ११३. १८१. मुं. सदर दिवाणी अदालतीचे रि. (१८२१ ता० १८४१ पर्यंत ) नं० २ पृ ४-११ १८२. बेलासिस रि. पृ. ७६ ता० ७८. १८३. मुं. स. दि. अदालतीचें रि. १८२० ता. १८४० पृ. २२२. १८४. वीरमित्रोदय, प. १०५ पृ. २ पं. १२; मुं. हायकोर्ट रि. वा. २ पृ. ६४ पहा.