पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. वरील मत वीरमित्रोदय ग्रंथाच्या आधाराने लिहिले आहे, परंतु व्यवहारमयूख- काराच्या मतें संसृष्ट आणि असंसृष्ट पुत्र असतां मृतसंसृष्टी पित्याचें द्रव्य संसृष्ट पुत्रासच मिळेल; असंसृष्टास मिळगार नाहीं. हे मत विशेष ग्राह्य दिसतें व याचप्रमाणें हल्ली इनसाफ होईल असे दिसतें. १६ 8 ( २५५.) संसृष्ट झालेल्या भावांतून कोणी भाऊ संन्यास घेतल्यामुळे किंवा प तितत्वामुळे किंवा मेल्यामुळे आपल्या भागास मुकेल, तर त्याचा भाग निराळा काढून ठेवावा; आणि जर त्याचा पुत्रादिक कोणी घेणारा नसेल, तर असंसृष्ट असे सख्खे भाऊ व संसृष्ट सावत्र भाऊ व बहिणी यांनी तो सारखा वांटून घ्यावा. १६७ (२१६.) संसृष्टीच्या जिंदगीचा विभाग करितेवेळीं मृत संसृष्टीची पत्नी गरो- दर आहे असे समजण्यांत न येतां विभाग झाला; नंतर जर तीस पुत्र झाला, तर संसृष्टी चुलता, भाऊ वगैरे यांनी त्याचा विभाग त्यास द्यावा. ११८ ( २५७. ) संसृष्टीचें धन घेणारा यानें त्यांच्या स्त्रियांचें पोषण करावें; परंतु त्या आपल्या स्वधर्मानें असतील तर. व्यभिचारिणी असतील तर करूं नये; आणि क न्या असतील तर त्यांच्या विवाहापर्यंत त्यांचें पोषण करावें, आणि त्यांचे विवाह करावे. १७३ ( २५८.) मुंबईच्या हायकोर्टानें स्पे० अ० नं० ८२६, सन १८६५ पैकीं, याचा फडशा ता. १९ माहे डिसेंबर सन १८६६ रोजी केला. त्यांत कोर्टानें असें ठरविले आहे कीं, जे दायाद विभक्त झाले असतील, ते सर्व किंवा त्यांतून कोणी तरी, हे मात्र संसृष्ट होऊं शकतील असा बृहस्पतीच्या वचनाचा आशय दिसतो. विभक्त होणा- ज्याच्या वंशजांची जर पुनः एकत्र होण्याची इच्छा असेल, तर ते होवोत; परंतु तशा एकत्रपणास हिंदुशास्त्रांतील अर्थाप्रमाणे संसर्ग असें ह्मणतां येणार नाहीं; आणि असे जे एकत्र झालेले असतील त्यांच्या दायास संसृष्टीचे नियम लागू होणार नाहींत. ( २५९. ) कोणी एका हिंदु कुटुंबांतील दायाद विभक्त झाले. त्यांतून एक मनुष्य अज्ञान आहे; आणि त्याची मिळकत व त्याच्या बापाची मिळकत मिश्र झाली आहे, आणि ते एका ठिकाणी राहतात; तर त्या मिळकतीच्या मिश्रणावरून व त्या एकत्र १६६. व्य. म. भा. पृ ६७; भा. २ पृ. २०३. १६७. वी. मि. प. २११ पृ. १ पं. १४ – १५; मि. भा. पृ. २३५; व्य. म. भा. २ रा पृ. २०२. १६८. मि. भा. पृ. २३३; व्य. म. भा. भा. २रा. पृ. २०१. भा.