पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुधर्मशास्त्र. प्र० ६ १५८ ( २४७. ) पुत्र व पुत्रावांचून दुसरा कोणी, हे संसृष्ट असल्यास पुत्रच घेईल. ( २४८. ) आई, बाप, भाऊ, चुलता, हे संसृष्टी विद्यमान असतां पहिल्याने आई घेईल; तिच्या अभावीं बाप घेईल; आणि भाऊ व चुलता इत्यादि संसृष्ट असतील तर ते समान वांटून घेतील.' १५९ १७२ ( २४९.) सखा भाऊ असंसृष्ट, व सावत्र भाऊ, चुलता, इत्यादिक संसृष्टी आहेत, तर ते संसृष्टीची जिंदगी समान वांटून घेतील. १६० ( २५०. ) जेथें असोदर संसृष्टी आहे, आणि सोदरअसंसृष्टी आहे, तेथें त्यांनीं संसृष्टीचें धन विभाग करून घ्यावें आणि जर सोदरही संसृष्टी आहे तर त्यानेच संसृष्टीचें द्रव्य घ्यावें; असोदर संसृष्टीस मिळणार नाही.' [१६१] ( २५१.) जर संसृष्ट असा बाप किंवा चुलता नसेल, तर असंसृष्टी असोदर ( स० सावत्र भाऊ ) संसृष्टीचें द्रव्य घेईल; त्याच्या अभावी असंसृष्ट पिता घेईल आणि त्याच्या अभावीं आई घेईल, व आईच्या अभावी पत्नी घेईल. १८२ ( २५२. ) एकटीच पत्नी जर नवयाशीं संसृष्ट आहे तर तीच मृतसंसृष्टी नव- ज्याचें द्रव्य घेईल; आणि पत्नी, व इतर, बाप, चुलता, भाऊ वगैरे, संसृष्ट आहेत, तर नव- ज्याचें द्रव्यं पत्नीस मिळणार नाहीं; परंतु द्रव्य घेणाऱ्यांनी तिचें पोषण मात्र केले पाहिजे. . ३६३ ( २५३.) बायकोच्या अभावी संसृष्टीचें द्रव्य त्याची बहीण घेईल; तिच्या अभावीं संसृष्टाचे जवळचे सपिण्ड यथांश घेतील. सपिण्डांच्या अभावीं समानोदक अस- तील ते संसृष्टीच्या धनाचे वारिस होतील." १६४ ( २५४.) अनेक पुत्र आहेत त्यांत एक संसृष्ट आणि दुसरे असंसृष्ट आहेत, तर, त्या उभयतांनीं बापाचें द्रव्य समविभाग करून घ्यावें, परंतु जो संसृष्ट पुत्र त्यानें आप- ल्यास भोगून बाकी राहिलेलें स्वतःचें संसृष्ट द्रव्य निराळें काढून बाकी राहिलेल्या संसृष्टी बापाच्या द्रव्याचा इतर भावांशीं समविभाग करून घ्यावा. १६५ १५८. व्य. म. भा. भाग २ रा पृ. २०३. ७५९. व्य. म. भा. भाग रा पृ. २०३. १६०. व्य. म. भा. भाग २ रा पृ. २०४. १६१. वी. प. २१० पृ. २ पं. १६; व पृ. २११ पृ. १ पं. १-६. १६२. वी. प. २१३. पृ. १ पं. १. १६३. व्य. म. भा. २रा पृ० २०४. १६४. बी. प. २१३ पृ. २ पं. २ व ७, व व्य. म. मा पृ. ६९; भाग २रा पृ. २०४. १६५. वी. प. २१३, पृ. २ पं. ९-१०.