पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० हिंदुधर्मशास्त्र. प्र० ६ जेव्हां वादीला १४२ आक्ट १५ परि० २२० १२७ प्रमाणे मुदतीत दावा असला पाहिजे. उपभोगांतून वगळला हे माहीत होईल तेव्हांपासून मुदत सुरू होते. ' बारा वर्षेपर्यंत भोगवटा नसला ह्मणजे हक्क जातो परंतु जर तो कबूल केलेला असेल अथवा उत्पन्न मिळालेले असेल तर जात नाहीं. १४३ ( २४०.) याविषय मद्रास हायकोटीने ठराव केला आहे की, दायावर जी पुत्रादिकांची सत्ता उत्पन्न होते ती जन्मतःच होत असते, यास्तव जरी एकत्र असणा- ऱ्या हिंदु कुटुंबांतील मुख्य ह्मणजे मूळ पुरुषं मेल्यानंतर बारा वर्षांहून अधिक मुदतीनें हिशाची फिर्याद आणली तरी चालेल, व तिला मुदतीच्या कायद्याची अटक येणार नाहीं. १४४ परंतु असे दिसतें कीं, जर इस्टेटीची स्थिति सामयिक नसून विरुद्ध पक्षका- रांच्या हातीं बारा वर्षांहून अधिक मुदतपर्यंत अनन्योपभुक्त असेल, ह्मणजे त्या मनुष्या- शिवाय त्या इस्टेटीचा उपभोग दुसऱ्यास प्राप्त झाला नसेल, तर त्यांतील हिस्सा घेण्याचा दावा चालणार नाहीं.' हल्लींच्या कायद्याप्रमाणे मागणारास एकीकडे ठेविले असे त्यास माहीत झाल्यापासून मुदत मोजली जाईल. १४६ १४५ कोणी हिस्सेदार नाश, गैरउपयोग करोल, अथवा दुसऱ्यास वगळील, तर ताकीद मागतां येईल. ' १४७ ( २४१.) इंडियन सक्सेशन आक्ट १८६९ चा १० याच्या तारखेपासून नेटिव विश्चियन लोकांना विभागाचें हिंदुधर्मशास्त्र लागत नाहीं.' १४८ १४२. ठाकूरदर्या वि. ठाकूर देवी का.रि. १ ई. अ. १. काली वि. धनंजय इं. ला. रि. ३ क. २२८. १४३. रामचंद्र नारायण वि. नारायण महादेव इं. ला. रि. ११ मुं. २१६. १४४. मद्रास हा. को. रि. वा. २ पृ. ३४७ व ४८. १४५. सदर्लंडस वीक्ली रिपोर्टर, वा. १ पू. १८६४; सदरहु ग्रंथांचे वा. ३ रे दिवाणी मुकदमे, अ. नं. ७४ सन १८६५ पृ. १४४. १४६. नारायण खुतीया वि. लोकनाथ खुतीया इं. ला. रि. कल. वा. ७ पृ. ४६१. १४७. अनंत वि० गोपाळ मुं. हा. को. छा. ठ. १८९४ पृ. १११. १४८. तेलीस वि. सालढाणा इं. ला. रि, १० म, ६९. १४०, दिवाणी मुकदमे, स्पे. अ. नं १३७ सन .