पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. पेरियास्वामी इं. ला. रि. १ म. ३१२ ह्यांत ठरले आहे. परंतु आपा वि. रंगा इं. ला. रि. ६ म. ७१ ह्यांत विरुद्ध ठराव आहे. त्यांत सर्व हिश्यावरचा हक्क करार करून सोडलेला होता. कोर्टानें तो करार गैरकायदा ठरविला. केवळ शास्त्रवचनांस सो- डूनही आपसांत समजुतीपत्रानें वांटण्या वगैरे झाल्या असतील तर तो बंदोबस्त ज्यांनीं केला त्यांस व त्यांच्या वंशजांस तो मोडतां येणार नाही असे स्पष्ट दिसतेंः (मू. इं. अ. वा. १३ पृ. ४९७). फारखतीनंतर तिन्हाइतानें फारखत करणारांतून कोणाजवळ खऱ्या बुद्धीनें व्यवहार केल्यास फारखत करणारांविरुद्ध ती फारखत कसा प्रतिबंध उ- त्पन्न करिते तें मू. इं. अ. वा. १४ पृ. ४१२ ह्यांत पहा. वांटपानें जर इस्टेटीचें नु- कसान होईल तर वादीला त्याच्या हिश्याची किंमत देववावी. '२० जेथें एकाद्या हिस्से- दाराला मुळींच उपभोग घेऊं दिलेला नाहीं अथवा जेथें वहिवाटणारा इस्टेट अविभाज्य आहे व आपली स्वतःची आहे अशी तकरार करील तेथें दरम्यानच्या उत्पन्नाचा हिस्सा दिला जाईल.” तसेंच जेथें अमुक इस्टेटीची अमुकानें वहिवाट करावी असे ठरलेलें असून जेव्हां त्याला कोणी अडथळा करील तेव्हां. १२२ कुटुंबाच्या समाईक जमिनीवर जर एकानें कर्ज काढून घर बांधलें, तर ज्या जमिनीवर त्यानें घर बांधले असेल त्या जमिनींत जितक्यांचे ·जे हिस्से असतील त्या मानानें त्या हिश्शांसमान दुसरी जमीन घर बांधणाराने त्या हिस्सेदारांस दिली पाहिजे ह्मणूनं मागणाऱ्या हिस्सेदारास जमिनीच्या किंमती- पुरता ऐवज देवविला ( पहा मुं. हा. को. रि. व्हा. ६ पृ. ५४). समाईक इस्टे- टीच्यासंबंधानें कांहीं करावयाचे असले तरी तें सर्वांनी मिळून व सर्वांच्या फायद्यासाठी केले पाहिजे. कोणी वादी होण्यास कबूल नसतील तर त्यांस प्रतिवादी करावें.२४ १२३ १२०. आशीनुल्ला वि. कालीकिंकर इं. ला रि. १० क. ६७५. १२१ कोनेरराव वि. गुरुराव इ. ला. रि. ५ मुं. ५९५. वेंकट वि. नारायण ला. रि. ७ इं. अ. ३८. वेंकट वि. राजगोपाळ ला. रि. ९ इं. अ. १२५. कृष्ण वि. सुचना इं. ला. रि, ७ म. ५६४. १२२. शंकरबक्ष वि. हरदेवबक्ष ला. रि. १६ इं. अ. ७१. १२३. बनारसी वि. महाराणीकुवर इं. ला. रि. ५ अ. २७, अरुणाचल वि. वैद्यलिंग इं. ला. रि. ६ म. २७. हरि गोपाळ वि. गोकुळदास इं. ला. रि. १२ मुं. १५८. बाळ गोपाळ वि. माकनाघटन इं. ला. रि. ७ क. ७५१. १२४. कुङ्कुशेरी वि. वालोटिल इं. ला. रि. ३ म. २३४. बिचुलाल वि. ओलीउल्ला इं. ला. रि. ११ क. ३३८. कालिचंद्र वि. राजकिशोर इं. ला. रि. ११ क. ६१५. द्वारकानाथ वि. ताराप्रसन्न इं. ला. रि. १७क. १६०.