पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. मिळविलेली असली पाहिजे. इतर नातेवाईक पोसणे एवढ्यानेंच एकत्रपणा शार्बाद होत नाहीं: ( मूळजी लीला वि. गोकूळदास वल्ला इं. ला. रि. ८ मुं. १५४ ). एका खटल्यांत असा प्रकार आढळला कीं, कांहीं इस्टेट बापानें व मुलांनी मिळून मिळविली. बापानें स्वतः मिळविलेल्या इस्टेटीपैकीं कांहीं इस्टेट निराळी काढून तिच्या मदतीनें त्यानें व मुलांनी इस्टेट वाढविली. नंतर बापानें मुलाचा त्यांतील हिस्सा दिला. तो हिस्सा वडिलार्जित आहे व त्यावर ( व ती मिळकत जंगम असली तरी ) असलेला नातवाचा हक्क मृत्युपत्रानें नष्ट करतां येत नाहीं असें मुंबई हायकोर्टानें उरविलें: (चतुर्भुज वि. धरमसी इं. ला. रि. ९ मुं० ४३८). मृत्युपत्रानें इस्टेट दिलेली असेल ती वार्डलार्जित आहे असें ह्मणणाऱ्या तसें शाबीद केलें पाहिजेः (नानाभाई गणपतराव वि. आचरटबाई इं. ला. १२ मुं. १२२). अविभक्त कुटुंबां- तील एखाद्या इसमाच्या ताब्यांतील इस्टेट समाईक आहेच असे नाहीं. मृत्युपत्रानें कांहीं दिलेलें असले तरी त्यास अनंश ठरविलेले नसेल तर बाकीच्या इस्टेटीवरचा हक्क जात नाही: (तुळशी- दास वि. प्रेमजी इं. ला. रि. १३ मुं. ६१). अविभक्त कुटुंबांतील एखाद्या स्त्रीच्या नांवानें एखादी इस्टेट लागलेली असेल तेव्हां ती समाईक आहे असे गृहीत धरले जात नाहीं: ( नारायण वि. कृष्ण इं. ला. रि. ८ म. २१४). बाप व मुलगे अविभक्त अ- सतांना बापानें एक पडीत जमीन लागवडीस आणली. जे ती स्वकष्टार्जित आहे असे ह्मणतील त्यांनी तसा पुरावा केला पाहिजे असा ठराव झालाः ( सुबय्या वि. चेलम्मा इं. ला रि. ९ म. ४७७). अविभक्त कुटुंब असले तरी बापाला स्वकष्टार्जित इस्टेट मृत्युप- त्रानें पाहिजे त्यास देतां येते. पडीत जमीन लागवडीस आणखी तरी कुटुंबाच्या पैशानें अथवा स्वतःच्या आणली एवढेंच पहावयाचें. विरुद्ध तकरार करणाऱ्या नें तसा पुरावा केला पाहिजे: ( सुबय्या वि. सुरय्या इं. ला. रि. १० म० २११). वडिलार्जित गांवाची वाढ झाली तर ती वडिलार्जिताप्रमाणे आहे : ४०२ व ११ अ. १९४). ( इं . ला. रि. ७ अ. वादीनें केला अमुक इस्टेट समाईक आहे अशी तकरार निघेल तेथें तसा पुरावा पाहिजे: ( अभयचरण वि. गोविंदचंद्र इं. ला. रि. ९ क. २३७). जेथें भाऊबंदांना अजीबात उपभोगांतून गाळलें नसेल तेथें ज्यानें त्यासाठी विशेष खर्च केला आहे त्यास जास्त फायदा मिळाला तरी ती इस्टेट समाईक नाहीं असें होत नाहीं. तशानें त्यांच्या हक्कास बाघ येत नाहीं. उपभोगाचें स्वरूप स्वतंत्र वहिवाट करून इतरांस गाळावयाचें असे असतां कामाचें नाहीं: ( लक्ष्मीश्वरसिंह वि. मनोवर हुसेन इं. ला. रि. १९ क. २५३). एका भाऊबंदानें एकाद्या इस्टेटीसंबंधानें आपला हिस्सा सोडला तर तेवढी- पुरता विभक्तपणा होतो, मग त्यानें तीऐवजी दुसरा विशेष भाग घेतला नाहीं तरी हरकत नाहीं असें बाळकृष्ण वि. सावित्री इं. ला. रि. ३ मुं. ५४ व पेरियास्वामी वि.