पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. चा निराळा होतो. जे परस्परांस व्याज देतात व परस्परांपासून व्याज घेतात, व जे आपापला खर्च निरनिराळा करितात, ते विभक्त असे समजावें. विभागपत्र नसेल, तरी हे विभक्त आहेत असे या गोष्टीवरून सिद्ध होऊं शकतें. ११८ ११९ जमाखर्च, गहाण, सावकारी आणि उदीम हे व्यवहार ज्यांचे निराळे होतात, ते विभक्त झाले असे समजावें. याप्रमाणेच ज्यांची घरें, व प्रपंचाची साधनें निराळीं आहेत, आणि परस्परांचें अनुमत न घेतां जे दान करितात, किंवा विकतात, आणि आपापल्या द्रव्याचा पाहिजे तसा उपयोग 'करितात ते विभक्त झाले असें समाजावें.' एका खटल्यांत असें शाबीद झाले कीं, जामनी निरनिराळ्या राहून प्रत्येक इसमाच्या वहि- वाटीस निरनिराळी इस्टेट पुष्कळ वर्षे होती व स्वतःच्याप्रमाणें वहिवाट होती. कोर्टानें विभाग झाला असें धरून चालले पाहिजे असें ठरविलें: ( मुरारी वि. मुकुंद इं. ला. रि. १५ मुं. २०१). एक इसम विभक्त झाला ह्मणजे बाकीचे विभक्त झालेच असें नाहीं; ( उपेंद्र नारायण वि. गोपिनाथ इं. ला. रि. ९ क. ८१७). मूळ कुटुंब विभक्त झाले तरी त्याच्या शाखा अविभक्त राहूं शकतील: (बटकृष्ण नाईक वि. चिंतामणी नाईक इं. ला. रि. १२ क. २६२ . ) खाणें पिणें वेगळें असले तरी कुंटुंब अविभक्त असेल तर अमुक इस्टेट स्वकष्टा- जिंत व ती " पितृद्रव्याविरोधानें " मिळविली आहे हे तसे ह्मणणायाने शाबीद केलें पाहिजे: (आ० कुंवर वि० खेडलाल मू० इं० अ० वा०२४ पृ० ४१२). परंतु या बोजाचें वजन पिढी दरपिढी कसें तुटत जातें तें जस्टिस वेस्ट यांच्या एका ठरावांत स्पष्ट केलेलें आहेः ( पहा मोरो विश्वनाथ कुळकर्णी व दुसरे, वि० गणेश विठ्ठल कुळकर्णी व दुसरे मुं० हा० रि० वा० १० पृ ४४१; पृ. ४१३ व ४५४ यांवर पुराव्याच्या बोजाविषयीं व्याख्या केलेली आहे ). याच बाबद कांहीं विचार ठाकूर दरियासिंह वि. ठा. दवीसिंह ( ला. रि. इं. अ. वा. १ पृ. १ व बं. ला. रि. वा. १३ पृ. १६५ ) ह्यांत पहावें. ह्या कज्जांतील कुंटुंब अयोध्येकडील असून त्यांत पूर्वी वाटण्या होत असत. अलीकडे ६-७ पिढ्या वांटप झाले नव्हतें; परंतु तेवढयावरून ती मिळकत अविभाज्य द्रव्य आहे असे ठरवितां येणार नाहीं असें ठरविलें. प्रत्येक कुटुंब एकत्र आहे असें धरून चालावयाचें. तरी एकाची स्वतंत्र इस्टेट असूं शकेल; परंतु तशी आहे असें त्यानें शाबीद केले पाहिजे. ती इस्टेट समाईक इष्टंटीच्या मदती शिवाय ११८. व्य. म. भा. २ रा. पृ. १८७. ११९. व्य. म. भा. २ रा पृ. १८८.