पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. 66 सन १८५० चा कायदा २१. 66 सन १८५० चे एप्रिल महिन्याचे अकरावे तारिखेस इंडियाचे गव्हर्नर जनरल कौन्सिल यांनी ठरविला. प्र० ६० सन १८३२ चे बंगाली कायदे पुस्तकांचे ७ वे कायद्याचे ९ वे कलमांतील ठराव ईस्ट इंडिया कंपनीचे अमलाखालचे सर्व देशांत लागू करण्यासाठीं कायदा. 66 66 सन १८३२ चे बंगाली कायदे पुस्तकांचे ७ वे कायद्याचे ९ वे कलमांतील ठराव असा होता की, " जेव्हां दिवाणी कोणतेही फिर्यादींत वादी व प्रतिवादी निरनिराळे धर्माचे असतील अथवा जेव्हां एका तरफेचा हिंदु आणि दुसरे तरफेचा मुसलमान असेल अथवा एक किंवा अनेक मुसलमान धमाच किंवा हिंदु धर्माचे नसतील तेव्हां त्या धर्मा शास्त्रांतील जो ठराव नसता तर त्या एकास किंवा अनेकांस मिळकत मिळाली असती असा तो मिळकतीस अटकाव करणारे ठरावावरून ती मिळकत घेऊं नये. " तो ठराव ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे अमलाखालचे सर्व देशांत लागू करावा है हितावह आहे. यास्तव असें ठरविलें आहे की- 66 १ ईस्ट इंडिया कंपनीचे अमलाखालचे देशामध्ये कोणी पुरुष किंवा स्त्री एक धर्म सोडून दुसरे धर्मांत जाईल अथवा कोणतेही धर्माच लोकांनी त्यास किंवा तीस धर्मांतून बहिष्कृत टाकिली अथवा जातीबाहेर टाकिली असे असतांही जे सध्यां चालू शास्त्र किंवा साधारण रीत यांचे योगानें त्यांचा हक्क किंवा मिळकत हीं नाहींशीं होतात किंवा वारस- पणाचा कोणताही हक्क कमी होतो किंवा बुडतो असा जो कोणताही शास्त्रांतील ठराव अथवा साधारण रीत हीं ईस्ट इंडिया कंपनीची कोर्टें व बादशाही सनदेवरून स्थापलेली सदरहु देशांतील कोर्टें यामध्ये कायद्याप्रमाणें अमलांत आणूं नये." मुसलमान झालेल्या हिंदूचा मुलगा, जो स्वतः मुसलमान होता, तो आपल्या हिंदु चुलत्याचा त्याची विधवा वारल्यावर वारस होतो असे भगवंतसिंह वि. काळू इं. ला. रि. ११ अ. १०० ह्यांत ठरलें. आतां विभाग हाऊन समायिक मिळकतीचे दायाद विभक्त झाले हे कसें समजावें याविषयी विचार करूं. ( २३२. ) विभाग झाला याविषयींचा निर्णय ज्ञाति, बांधव, साक्षी, लेख, स्थाव रांचे वांटे इत्यादि कारणांवरून करावा. जे विभक्त झाले त्यांची कर्मे पृथक होतात. देवपूजा, वैश्वदेव इत्यादि. ११७ साक्ष, जामिनकी, कर्ज देणें व घेणें, हे व्यवहार विभक्त भाऊ परस्पर करितात. अविभक्त असतील ते करीत नाहींत. पशु, अन्न, गृह, क्षेत्र यांचा प्रतिग्रह विभक्तां- ११७. व्य. म. भाग २ रा पृ. १८५९८६, मि. भा. पृ. २४७.