पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. आहे, ह्मणून त्या शिक्षसे आणखी दुसरी शिक्षा मिळवून दाय घेण्याचा हक्क कमी करितां येत नाहीं. १०५ ( २२४. ) जर कोणी मनुष्य किंवा स्त्री हीं अंध किंवा बधिर असतील, तर त्यांस आपल्या बापाच्या इस्टेटींतील अंश मिळणार नाहीं; परंतु दुसऱ्या दायादां- नीं त्यांचें पोषण केले पाहिजे. परंतु सदरहु इस्टेटीच्या वांटण्या झाल्यानंतर जर त्यांचीं व्यंगें दूर झाली, तर त्यांस हिस्सा मिळेल; आणि कदाचित् प्रथम दाय घेऊन विभक्त झाल्यावर त्या पुरुषास किंवा स्त्रीस वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही व्यंग प्राप्त झालें तरी त्यांचा हिस्सा दुसऱ्या वारशांस मिळत नाहीं, अप्ता मुंबई सदर दिवाणी अदालतीनें ठराव केला होता. परंतु आतां सन १८८२ चे छापी ठराव पा० २३८ वरून कसें होईल तें सांगवत नाहीं. हा बंगाल शास्त्रास अनुसरून आहे. एकदा वारशाला किंवा हिश्याला हक्क उत्पन्न झाला ह्मणजे नंतरच्या व्यंगानें तो जात नाहीं.' १०७ ( २२५. ) जर कोणी हिंदु विधवा आपल्या नवऱ्याच्या इतर सग्यांपासून निरा- ळी राहील, तर तितक्यावरून तिच्या नवन्याचा दाय घेण्याचा तिचा हक्क नाहींसा होत नाहीं.' १०८ (२२६.) कोणी मुलगा दुसऱ्या कुटुंबांत दत्तक दिला ह्मणजे तो पूर्वीचे कुटुं- बांत अनंश होतो. ' १०९ ( २२७. ) कोणी मनुष्यानें एक मुलगा सशास्त्र रीतीनें दत्तक घेतला तर दत्त- विधान झाल्यानंतर पुढे तो मुलगा वाईट चालीचा निवाला ह्मणून त्याला अनंश ठरवून दुसरा मुलगा दत्तक घेऊन पहिल्या मुलाच्या वंशजांचें नुकसान बापास करितां येत नाहीं असे दिसतें." (२२८.) एका मनुष्याची इस्टेट जत करून सरकाराने दुसऱ्या मनुष्यास १०५. म. सद. दि० अ. चे रि. सन १८५८, ता. ११ आगस्ट स. १८५१. १०६. बारो. रि. वा. २ पृ. ६५६-६७७ नं. १३३. १०७. देवकिसन वि. बुंधप्रकाश इं, ला. रि. ५ अ. ५०९. केरी होलिटाणी वि० मणीराम इं. ला. रि. १४ म. २९४; ५ क. ७७६ प्रि. कौ. बापुजी वि. पांडुरंग इं. ला. रि. ६ मुं. ६१६. परंतु कृष्ण वि. स्वामी इं. ला. रि. ९ म. ६४ पहावा. १०८. मा. डै. वा. १ प. ३३८ कल. २४६, व या मतास सदरलण्ड्स् वी. वा. ६ प. ३७ अ. नं. ८० सन १८६६ याचाही आधार मिळतो. १०९. प. २९ पहा. शिवाय, मार्लि. डै. वा. १ पृ. ३३७ क. २३७ यांतील नमुद केलेले कज्जे पहा. ११०. मुं. स. अ. चा ठराव ता. ६ अक्टोबर १८१३ बा. रि. वा. १ पृ. ७५ ता. ८७, २१