पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ उपाय करून असाध्य आहे असे झाले पाहिजे. कोड किंवा महाव्याधि झाला असेल तर त्या रोगाचें स्वरूप साधारण असून सौम्य असेल तर तेवढ्यावरून तो मनुष्य अनंश होणार नाहीं; परंतु तो रोग वाढला आणि अति कठिण झाला, ह्मणजे मात्र त्या रोग्याचा दायाचा अधिकार जाईल.' याच प्रकारचे ठराव जनार्दन वि. गोपाळ मुं० हा० रि० व्हा० ५ अ० शा० पा० १४९; अनंत वि० रमाबाई इं० ला० रि० मुं० व्हा० १ पा० ५५४ या कज्यांत झाले आहेत. [[[१०१] ० (२२०.) खूळ किंवा चळ हीं कोणांस असल्यामुळे ते मनुष्य अनंश होतात; परंतु कोणीही हिंदु तसा अनंश होण्यास त्याला केवळ सर्वांशी बेशुद्धपणा असला पाहिजे असें नाहीं. जर कोणी जन्मापासून खुळचर असून साधारण व्यवहारास निरु- पयोगी असेल, तर त्यास दायाचा अंश मिळणार नाहीं अता मद्रास हायकोर्टानें ठराव केला आहे.' १०२ ( २२१. ) अशा भोळकट मनुष्यानें आपल्या सग्यांच्या अनुमतीशिवाय केलेली विक्री मुंबई सदर दि० अ० नें रद्द केली आहे. १०३ ( २.२२. ) कोणी हिंदु विधवा हिणें आपला विभक्त झालेला नवरा मयत झाला त्याची इस्टेट आपणास वारशाच्या हक्काने मिळावी ह्मणून फिर्याद केली. ती अंध होती ह्मणून तिचा दावा चालूं नये अशी पुतण्यानें तक्रार केल्यावरून तिचा दावा रद्द झाला; परंतु तिच्या अन्नवस्त्राविषयीं त्याच निवाड्यांत अपील कोर्टानें ठराव केला. १०४ ( २२३. ) कोणी पुरुषानें कुटुंबाच्या मिळकतीपैकीं कांहीं मिळकत चोरली तर धर्मशास्त्राप्रमाणे तो दायास अनधिकारी होतो; परंतु जेव्हां हिंदु लोकांचा फौजदारी कायदा चालत होता तेव्हां ही गोष्ट लागू होती. सांप्रत फौजदारी कायदा निराळा असून निरनिराळ्या गुन्ह्यांस त्यांच्या त्यांच्या स्वरूपाप्रमाणे निरनिराळी शिक्षा ठरविलेली १०१. म. सदर अदा. चे रि. सन १८६० चे पृ. २३९, ३१ अक्टोबर १८६० मुतुवेल्हायदु पिले वि. परशुती. याचप्रमाणे मुं. हायकोटीनें स्पे. अ. नं. ३९२ सन १८६७ यांत ता. २० आगस्ट रोजी ठराव केला आहे आणि १० वर्षेपर्यंत व्यथित असून आपल्या इस्टेटीची वहिवाट करणार अशानें दिलेले गहाण सशास्त्र ठरविले आहे. १०२. म. हाय. रि. वा. १ ले पृ. २०४ ता. १९ फेब्रुवारी सन १८६३, तिरुमगोळ अंमळ वि. रामस्वामी अय्यंगार व दुसरा. १०३. बा रि. वा. २ पृ. ११४ ता. ११९ नं. २०, लखमीदास वीरीदास वि. बाई माणकुवर, परभूदास याची विधवा. १०४. बा. रि. वा. १ पृ. ४११-४१२.