पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १५९ सांगितलें तें जर तो विभाग होण्यापूर्वी पतित झाला असेल तर जाणावें. विभाग झाल्या- नंतर त्यानें घेतलेल्या विभागास तो मुकणार नाहीं. ९७ ( २१७.) नपुंसक आणि अंघ हे जर जन्मापासूनच तसे असतील, तर त्यांस विभाग मिळणार नाहीं; आणि जर पाठीमागून झालेले असतील, तर औषधादि उपचा- रांनी त्यांचे अंधत्व किंवा नपुंसकत्व जाईल, तर त्यांस विभक्त झालेल्यांकडून विद्यमान द्रव्यांतून विभाग द्यावा. याप्रमाणेच अचिकित्स्य रोगी इत्यादिकांविषयींही जाणावें; ह्मणजे जर औषधादि उपायांनी त्यांचा रोग गेला, तर तेही विभागातें पावतील.' ९८ ( २१७ अ. ) अन्ध, बहिरा, व मुका हा तसा जन्मापासून असेल तर मात्र अनंश होतोः ( पहा. बं. ला. रि. व्हा. १४ पा. २७३; मुरारजी वि. पार्वतीबाई इं. ला. रि. मुं. व्हा. १ पा. १७७; १५७; उमाबाई वि. भाऊ बं. ला. रि. व्हा. १ पा. ११७; मुं. हा. रि. व्हा. ४ पा. १३५, हिरासिंह वि. गंगासाहै इं. ला. रि. ६ अ. ३२२; चरणचंद्र वि. नोबो सुंदरी १८ क. ३२७; रणविजय वि. जगत्पालसिंह १८ क. ११९ प्रि. कौ. ) ( २१८. ) अनंशांचे पुत्र जर निर्दोष असतील, तर ते विभाग घेतीलच, आणि त्यांच्या कन्या असतील, तर त्यांचें लग्न होईपर्यंत पोषण करावें आणि लग्नही करावें. त्यांच्या निपुत्रिक स्त्रिया व्यभिचारिणी नसतील, तर त्यांचें पोषण करावें; व्यभिचारिणी असतील तर घालवून द्याव्या; आणि केवळ प्रतिकूल असतील, तर त्यांस बाहेर घा- लवाव्या, परंतु त्यांचें पोषण केले पाहिजे:” ( परंतु पहा स. १८८२ चे छापी ठराव पृ. २३८. ) ( २१८ अ. ) जे अनंश सांगितले त्यांचें विभाग घेणाऱ्यांनी पोषण करावें, परंतु आश्रमांतर्गत, पतित, व पतिताचा पुत्र, संन्यासभ्रष्ट, व त्याचा पुत्र, यांचें पोषणही करूं नये. याचप्रमाणें पतितापासून झालेल्या पुत्राचेंही पोषण करूं नये, असे सांगि- तलेले आहे. ' १०० ( २१९.) आतां कलम १८१ तागाईत १८५ यांत जे अनंश वर्णिले ते मूळयं- थांच्या आधाराने सांगितले आहेत; परंतु यांतील सर्व नियम सारखे सांप्रत अमलांत येत नाहींत. ( २१९ अ.) असाध्य रोगग्रस्त हा हिस्सा मागण्यास लायक नाहीं, परंतु तो रोग ९५. वीरमि. प. २२१ पृ. २ प. ७. ९८. वीरमि. प. २२१ पृ. २ पं. १, व्य. म. भा २ रा पृ. २१४- २१७. ९९. व्य. म. भा. २ रा. पृ. २१८ वीरमि. प. २२२, पृ. १ पं. ८-१०. १००. व्य. म. भा. २ रा पृ. २१५-१