पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशाख. प्र० ६ पासून मुलगे झाल्यास ज्याचें जन्म प्रथम होईल तो वडील गणला जाईल. त्याच्या आई- च्या पूर्वापर विवाहामुळे हक्कांत कमीजास्ती होणार नाही, असा ठराव झाला आहेः ( रामलक्ष्मी वि० शिवनाथ मू० इं० अ० व्हा० १४ पृ० ५७० ). मनुस्मृति अ० ९ श्लो. १२२ प्रमाणे हा ठराव योग्यच आहे; परंतु धर्मपत्नीची प्रजा पुष्कळ ठिकाणीं वरिष्ठ मोजून तो वंश आहेपर्यंत दुसऱ्या स्त्रियांपासून झालेल्या प्र- जांस वतनें इत्यादि मिळत नाहीत; आणि तत्वदृष्ट्या एक स्त्री असतां दुसरी करणें ह्यांत सत्याचा अतिक्रम होतो असें मला• भासतें. देशाचार ह्यांच्या विरुद्ध आहे हें स्पष्टच आहे. ह्याच बाबतींत शिवगंगा जमीनदारीचा मुकदमा पहावा ( मू. इं. अ. व्हा. १ पृ. १३०, व दुसरा, चौधरी वि. नवलखो कुवारी, ला रिपोटर्स इं. अ. व्हा. २ पृ. २६३ पहा. ) एकादी इस्टेट अविभाज्य असल्यामुळे वडिलाकडेच राहण्याची आहे ह्मणून ती समाईक मिळकत नव्हे किंवा वडील वहिवाटदाराची स्वसंपादित मिळकतीसारखी अशी होत नाहीं. अखेरचा वहिवाटदार निपुत्रिक मृत झाला असतां समाईक आहे मानून ज्यांचे हक्क अधिक प्रबल असतील त्यांना ती इस्टेट मिळेल. ( इं. ला. रि. क. व्हा. ४ पा. १९०. ) ९४ ९५ (२१५.) ज्यांस विभाग मिळतं नाहीं ते अनंश होत. त्यांस दायाचा अधिकार नाहीं. षण्ढ, पतित, पतितापासून उत्पन्न झालेला, पांगळा, उन्मत्त, अज्ञान, असाध्यरोगग्रस्त, जन्मांध, जन्मबधिर, बापाचा द्वेष करणारा, निरिन्द्रिय, ( नकटा वगैरे ) अपयात्रित, ४ आश्रमांर्गत ह्म० नै ठिक ब्रह्मचारी व संन्यासी, अक्रमोढासुत, सगोत्रापासून झालेला, संन्यासभ्रष्ट, प्रतिलोमप्रसूत ( ह्म० प्रतिलोम जातीच्या स्त्रीपासून झालेली संतति ), विकर्म आचरण करणारा, कोड्या, निषिद्ध चिन्ह धारण करणारा, मुका, उपपातकी, इतक्यांस विभाग देऊं नये, " असें ह्मटलेलें आहे. (२१६.) पतित आणि उपपातकी हे प्रायश्चित्त घेऊन शुद्ध होत तावत्काल- र्यंत त्यांस विभाग देऊं नये ; प्रायश्चित्त घेतल्यानंतर ते विभाग घेतील. जर दांडगाईनें वगैरे ते प्रायश्चित्त न घेतील, तर ते पतितच राहतील. पतितास विभाग नाहीं असें ९४. ज्याचा घटस्फोटविधीनें परित्याग केला तो, असें कमलाकरभट्टाचें व मदनाचे मत आहे. दुसरें, नावेंत बसून व्यापारार्थ समुद्रांतून द्वीपांतरीं जाणारा तो अपयात्रित, असें मयूखकाराचें मत आहे. व्य. म. भाग २ रा पृ. २१४. ९५. ज्येष्ठ कन्येचा विवाह न करितां कनिष्ठ कन्येचा विवाह केला असता त्या दोघी अक्रमोढा होतात ह्मणून त्यांपासून झालेला जो पुत्र तो अक्रमाढासुत. ९६. व्य. म. भाग २ रा. पृ. २१५.