पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाय विभाग. धनकोंना फेड करून घेतां येतेः (कोटाराम प्र. ६ घेतली की इस्टेटीवर स्वतःच्या कर्जाची स्वामी वि० बंगारी इं. ला. रि. ३ म. १४५. ) ९३ (२१४.) सरकारची चाकरी बजाविल्यावरून मिळालेलें इनाम, याचा हिस्सा बंधु आदिकरून दायादांस मिळणार नाहीं." तरी संपादकाच्या मरणानंतर पुढे त्या इनामांची वांटणी होऊन हिस्सेरशीप्रमाणे पुत्रादिकांस मिळेल; मूर्स इं. अ. वा. ६ पृ. ४२५. परंतु कुटुंबाचा मरातब व योग्यता राखण्यासाठी ह्मणून विशेष ठराव करून. जर जमिनी दिल्या असतील तर त्यांचा विभाग होणार नाहीं: ( ( म. स. अ. चा ठराव रे. अ. नं. ५ सन १८५०) कुटुंबाच्या निर्वाहाकरितां असेल तर हिस्सा मिळेलः (इं. ला.. रि. ७ म. १९१ ). राजाने दिलेले ज्याला त्याचें तें स्वकष्टार्जित मग नवें असो अगर जुनें जप्त केलेले असो. सन १८६७ मध्ये एका जमीनदारानें बंड केल्यावरून त्याची हंसपूरची जमीनदारी जप्त करून २० वर्षे सरकाराने आपल्या वहिवाटीस ठेवून त्या कुटुंबांतील दुसऱ्या दायादांस पुढे दिली. त्यानंतर त्या जमीनदारबिद्दल तंटा पडला तेव्हां प्रिव्ही कौन्सिलानें असा ठराव केला की, ज्या स्थितीत सरकारानें जमीनदारी अपल्या कबजांत घेतली त्या स्थितीविरुद्ध कांहीं झालेले नाहीं ह्मणून त्या स्थितीतच ती परत देण्याचा सर- कारचा उद्देश होता असे ठरविलें पाहिजे: ( मू० इं० अ० व्हा० १२ पृ० १ ). मद्रास इलाख्यांत नजवदि ह्मणून अशीच अविभाज्य जहागीर होती ती अशीच बंडाच्या सबबनें सरकारानें जप्त करून बंडखोराच्या मुलाला दिली. पुढे ती सरकारी साऱ्याच्या संबंधानें खालसा झाली. त्यानंतर तिचे दोन भाग करून दोन पुरुषांस चाकरपेशानें वंशपरंप- रेच्या सत्तेनें दिली. त्यावरून शेवटी ठरांव झाला की, दुसऱ्या सनदांनंतर ही जमीन- दारी साधारण इतर हिंदु द्रव्याप्रमाणे वंशजांमध्ये विभागली पाहिजेः ( राजे वेंकटनरासं- हप्पा वि० राजे नारयप्पा व दुसरे; ला० रि० इं० अ० वा० ७ पृ० ३८; सद० प्रि० कौ• जज० वा० ३ पृ० ७२५). हिंदुस्थानांतील राजांमध्यें राजाची दोन प्रकारची मिळकत असूं शकेल. ह्मणजे एक गादीची मिळकत आणि दुसरी खासगी मिळकत. हा पाठ पुष्कळ ठिकाणी चालू होता आणि जमीनदारांच्या संबंधानेंही असा सांप्रत होण्याला रस्ता आहे: ( पाहा मू० इं० अ० व्हा ७ पृ० ४७६; तंजावरच्या राजाचा मुकदामा ). प्राचीन काळी निरनिराळ्या जातींच्या स्त्रिया अनुक्रमानें करण्याचा अधिकार तिन्ही व रिष्ठ जातींस होता. आतां तसे नाहीं, तथापि पहिली बायको खेरीज करून इतर स्त्रियां- - ९३. कटमानाचियर वि. शिवगंगाचे राजे ९ मुं. इं. अ. ६०६. . घाटवाली इनाम अविभाज्य आहे. नीलमणी वि. बक्रानाथ इ. ला रि. ९म. १०४, तसेंच मद्रासॅत कर्ममची जमीन; इं. ला. रि. ७ म. २३६.