पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ हिन्दु धर्मशास्त्र. रागत वृत्ति, आणि वापरलेलें व विभाग करण्यास जें योग्य नव्हे असे वस्त्रालंकार; ही सर्व भावांनी कारणानुसार वहिवाटावीं." ( २११. ) समाईक कुटुंब असतां एकाद्या हिस्सेदारास तेढ्या वंशजाकडून अगर दुसऱ्या संबंध्याकडून वारशानें मिळेल तें स्वार्जितासारखेंच गणिलें जाऊन वि भागास पात्र होणार नाहीं. (पहा म० हा० रि० व्हा० ३ पा० ४५५; बं० ला० रि० व्हा० १० पा० १८३; वी० रि० व्हा० २० पा० १७०; गंगाप्रसाद वि० अयो- ध्याप्रसाद इं. ला. रि. ८ क. १३१. यशोदा कुवर वि० शिवप्रसाद इं. ला. रि. १७ क. ३८. नानाभाई वि० आचरटबाई इं. ला. रि. १२ मुं. १३३ ). (२१२.) मोठ्यामोठ्या जमीनदाऱ्या, ज्यांचा विभाग करण्याचा देशरिवाज नाही, त्यांचा विभाग होऊं शकत नाहीं: ( मूर्स इं. अ. वा. २ पृ. ४४१ ) परंतु जग- न्नाथ वि० रामभद्र इं. ला. रि. १० म. २५१ ह्या मुकदम्यांत पुराव्यावरून विभाग केलेला आढळतो. विरुद्ध रिवाज नसेल तर जमीनदाऱ्या वडील मुलाकडे जातातः ( भवानी गुलाम वि० देवराजकुमारी इं. ला. रि. ५ अ. ५४२). इस्टेट विभाज्य किंवा आवभाज्य हें पुराव्यानें ठरवावयाचे आहे: ( मल्लिकार्जुन वि० दुर्गा इं. ला. रि. १३ म. ४०६.) ज्याच्याकडे ती जाते त्याची ती स्वतंत्र इस्टेट नव्हे. अविभाज्याचा वारसा पुरुष असतां स्त्रीकडे जात नाहीं. (इं. ला. रि. ७ अ. १ ). (२१३.) राज्याचा विभाग होऊं शकत नाही. राजाची खासगत इस्टेट असेल, तिचा मात्र विभाग होऊन निराळ्या वारिसांस मिळेल: ( मूर्स इं. अ. वा. ७ पृ. ४७६). देशमुखी व देशपांडे वतनांचा विभाग त्यासंबंधाची कामगिरी बंद झाली तरी होत नाहीं. वडिलाकडे जाण्याचा रिवाज आहे असें गोपाळराव वि० त्रिंबक इं. ला. रि. १० मुं. ५९८ व रामराव वि० यशवंतराव इं.ला. रि. १० मुं. ३२७. ह्यांत ठरले आहे. तसेंच सरंजामही विरुद्ध रिवाज नसेल तर अविभाज्य आहे. ज्याच्या वहिवाटीस जाईल त्यानें धाकट्या भावांच्या चरितार्थाची तजवीज केली पाहिजे: ( माधवराव मनोहर वि० आ- त्माराम केशव इं. ला. रि. १९ मुं. ११९). जहागीर तहायत असें गृहीत धरून चाला- वयाचे असे गुलाबदास वि० सुरतचे कलेक्टर ला. रि. ६ इं. अ. ५४ ह्यांत ठरले आहे. तसाच ठराव इं. ला. रि. १५ मुं. २२२ ह्यांत आहे. जमीनदारीच्या उत्पन्नांतून विकत ९. २ व्य. म. भा. भाग. २ रा पृ. १०३. कांहीं मिळकत एका गृहस्थानें एका मूर्तीच्या पूजेकरितां योजून मृत्युपुल करून ठेविलें; पुढे त्याच्या वंशजांचा तंटा पडून वांटण्या झाल्या; तेव्हां कोटीनें असें ठ- रविलें कीं, ती मूर्ति व तिच्या पूजेकरितां ठेविलेली इस्टेट यांचा विभाग न करितां ती पाळीपाळीने सर्वांनीं . वहिवाटावी; ह्मणजे प्रत्येक वारसानें मूर्तीची पूजा करून तत्संबंधी इस्टेटीचा उपभोग घ्यावा. नोबिन किसन मित्र वि. हरिश्चंद्र मित्र व दुसरा; ता. ११ अक्टोबर सन १८१९. मेकूनाटन् यानें केलेला हिं- दुशास्त्राविषयीं ग्रंथ पृ. ३२३.