पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाय विभाग. १५५ ( २०४.) पित्यानें वापरलेले वस्त्र, अलंकार, शय्या, वाहन, इत्यादिक जें असेल, तें पिता मेल्यानंतर त्याच्या श्राद्धी जेवणारास पूजन करून समर्पण करावें. ८६ ८७ ( २०५. ) शेळ्या, बकऱ्या, एकशफ पशु ( स० घोडा, गाढव, खेचर, इ० ), हीं विषम असल्यास दांटू नयेत; वडील असेल त्यानेंच घ्यावीं. ह्मणजे वांटणी होण्याजोगी असेल तितकी करून, वरील विषम संख्या वडिलानें घ्यावी, असा आशय दिसतो. (२०६.) शिजलेलें अन्न, वापी, कूप, यांचा यथासंभव ह्मणजे होण्याजोग्या री- तीनें उपयोग करावा, परंतु विभाग करूं नये. “ ८९ ( २०७.) दासी विषम असल्यास, त्यांकडून पाळीपाळीनें काम घ्यावें आणि सम असतील, तर वांटून घ्याव्या. परंतु पित्यानें भोगार्थ ठेविलेल्या असतील, त्या सम असतील तरी त्यांचा विभाग करूं नये. “ सन १८४३ चा आक्ट ५ यावरून कोणास दास्यस्थितीमध्ये ठेवणें मना झाले आहे, यास्तव आतां दासीचा विभाग होणें मुळींच संभवत नाहीं. ( २०८.) तळीं, बाग, यज्ञ, ब्राह्मणभोजन, इत्यादिकांच्या उद्देशानें जें द्रव्य सर्वांच्या अनुमतीनें ठेविलेले असेल, त्या द्रव्याचा त्याच कार्याकडे उपयोग करणें तो ज्याणें तें द्रव्य ठेविलें असेल त्याणेंच करावा; दुसऱ्याने करूं नये, अथवा सर्वांनी मिळून.. करूं नये. ९० ( २०९. ) वापी (ह्म० जिला पायऱ्या आहेत ती ), व कूप यांचा जसा उप- योग असेल, त्याप्रमाणे पाणी घेऊन उपयोग करावा. पूल, बागाईत हीं यथाविभाग वांटून ध्यावीं. जाण्यायेण्याचा मार्ग, व गाई चरविण्याचें रान, हीं चालीप्रमाणें वहि- वाटावी.” ( २१०. ) हे इतकें धर्मार्थ, असा लेख करून ठेवलेले धन; पाणी, दास, परंप- ८६. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १८२. वीरमि. प. २२१ पृ. १ पं. ९. ८७. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १८२. ८८. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १८२ वीरमि. प. २२१ पृ. १ पं. ३. ८९. व्य. म. भा. भाग २ रा पृ. १८२ वीरमि. प. २२१ पृ. १ पं. ४. ९० व्य. म. भा. भाग २ रा पृ. १८२ (अशा द्रव्याचा विभाग होणार नाही; ) परंतु अशा धर्मार्थ कामाकरितां •अर कांहीं जमीन लावून दिली असेल तर त्या जमिनीची वहिवाट वंशजांस मिळेल. मा. है. वा. १ पृ. ५५१ क. १५. ९१. व्य. म. भा. भाग २ रा. पृ. १८३.