पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ धर्मवर्ती स्त्री, व लहान मुले इत्यादि, इतक्यांचा संग्रह अवश्य पोण्यांमध्ये करावा है बरें दिसतें. विद्वानानें, इच्छा असल्यास, स्वसंपादित द्रव्याचा विभाग विद्वान् भावास द्यावा; नसल्यास देऊं नये; आणि अविद्वान् असतील त्यांस तर कधीही देऊ नये. ७७ १९९.) विद्याधनाचा वांटा भावांस देऊं नये, असा निषेव सांगितला; तो त्या भावांस ह्या द्रव्याशिवाय दुसरें द्रव्य असेल तर जाणावा. दुसरें द्रव्य नसेल तर त्यांसही हिस्सा द्यावा असें मदनाचें मत आहे. ७८ ( २००.) आजा, बाप, आई यांणी ज्यास जें दिले असेल तेही अविभाज्य जा णावें. तसेंच शौर्यसंपादित, व ध्वजाहत, व सौदायिक, “ व कन्यागत; " इतक्या प्र- कारचीं धनें अविभाज्य आहेत; ह्मणजे यांचा विभाग भावांस मिळावयाचा नाहीं." ७९ ( २०१.) शौर्यसंपादित व ध्वजाहत, हीं द्रव्यें अविभाज्य असे सांगितले; परं- तु जर तीं समाईक शस्त्रादिकांचा किंवा वाहनादिकांचा आश्रय करून पराक्रमानें संपादन केली असतील, तर संपादकाने दोन हिस्से घेऊन वरकड भावांनी समविभाग घ्यावे. ८३ ८४ ( २०२.) अविद्वान् भावांनी आईबापांचें द्रव्य न खर्चितां शेतकी वगैरे करून द्रव्य मिळविलें असेल, तर त्याचा विभाग सर्व भावांस द्यावा, ४ अर्से वचन आहे; परंतु हे द्रव्य स्वकष्टार्जित आहे यास्तव सांप्रत याचा विभाग होईल असे दिसत नाहीं. ( १०३. ) वस्त्र, वाहन, किंवा अलंकार, जो वहिवाटीत असेल, ते त्याचेंच; परंतु सारख्या किमतीचें असेल तर, कमजास्ति असेल तर, वांटून घ्यावें. ८५ ७७. व्य० म० भा० भा० २ रा० पृ० १८०. ७८. ध्य० म० भा० भा० २ रा पृ० १८०. ७९. शत्रूचें सैन्य पळवून युद्धापासून जें आणिलें तें द्रव्य ध्वजाहृत होय. ८०. लग्न झाल्यानंतर नवन्यापासून व माहेरी असतां भावांपासून किंवा आईबापांपासून जे द्रव्य स्त्रीस मिळतें तें सौदायिक जाणावें. ८१. सजातीय कन्येशीं विवाह करितांना जे मिळतें तें द्रव्य कन्यागत झटलेले आहे. आणखी विवा- शब्या ठायीं में कन्येस गोमिथुन ह्मणजे एक गाय व एक बैल देतात, तें कन्यागत. ८२. व्य. म. भा. भा. २ रा पृ. १८०-१८१.. ८३. व्य. म. भा. भा. २ रा पृ. १८०-१८१, ८४. व्य. म. भा. भा. २ रापृ. १८१. ८५. व्य. म. भा. भा. २ रा पू. १८२०