पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १५३ असले तरी तितक्यावरून कांहीं कमीपणा न येतां, त्यानें स्वतः आपल्या विद्येनें व यो- ग्यतेनें जें चाकरी करून द्रव्य मिळविलें तें अविभाज्यच होय असें आह्मीं ठरवितों; ह्म- णून सावत्र भावाचा दावा रद्द करून मयताच्या विधवेच्या वतीनें निवाडा केला. ७१ कुलापासून किंवा बापापासून विद्या संपादन करून त्या विद्येवर जर द्रव्य संपादन करील, तर त्या धनाचा विभाग भावांस दिला पाहिजे." परंतु मूलतत्वांचीच विद्या स माईक उत्पन्नाच्या खर्चानें झाली असेल तर तें द्रव्य अविभाज्य आहे. परंतु मिळवि- णागनें जर तें द्रव्य समाईकांत खुषीने टाकले असेल तर मात्र विभाग होतील. ७२ ( १९७.) जो कोणी कारागीर तयार केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षां अधिक बक्षीस मिळवितो, तें त्याचें विद्याधन समजावें. यज्ञाच्या ठायीं ऋत्विजास जे मिळतें तें त्याचे विद्याधन आहे. शिष्यापासून गुरूला जे मिळतें तें त्याचें विद्याधन जाणावें. विद्या व तत्संपादित द्रव्य, हीं, आईबापांच्या द्रव्याचा व्यय न होतां जर संपा- दित असतील, तर अविभाज्य अर्से पूर्वी लिहिलेच आहे. जर तीं द्रव्य खर्चून संपा- दित असतील तर विभाज्यच जाणावीं; परंतु द्रव्य खर्चूनही संपादित असेल तरी संपा- दकास दोन हिस्ले मिळतील असे लिहिलेले आहे. नायकिणीच्या दत्तक मुलीने तिच्या खर्चानें मिळविलेल्या गायनशिक्षणावर तिच्या आईचा हक्क राहतो. ७४ ७५ ७६ ( १९८. ) विद्याध्ययन करणाऱ्या भावाच्या कुटुंबाचें जो पोषण करितो, त्यास जरी धनाचा विभाग देण्याचा ठराव नसेल, तरी विभाग द्यावा, असें ह्मटलेले आहे. आतां, कुटुंब ह्मणजे जीं मनुष्यें अवश्य पोप्य आहेत तींः उदाहरण, – वृद्ध आईबापें, ७१. व्य० म० भा० भा० २ पृ० १७९. व्यवहारमाधव दायभाग अविभाज्यप्रकरण पहा. ७२. कृष्णाजी वि० मोरो इं० ला० रि० १५ मुं० ३२. इतरही स्वकष्टार्जित समाइकांत टाकले तर तें समाईक होतें. ला० रि० ३ ई० अ० २५९; १६ ई० अ० ७१; इं० ला० रि० १० क० ३९२; १६ क० ३९७; १५ मुं० ५१९; ७ म. ४५८. ७३. व्य० म० भा० २ रा पृ० १७८. ७४. व्य० म०मा० भा० २ रा पृ० १७८-१७९. मि० मा० पृ० १८७ याविषयीं साफ ठराव पहाण्यांत आलेला नाही; परंतु याविषयीं बराच संशय आहे. समाईक मिळकतींतून थोडी मदत घेऊन, परंतु मुख्यत्वेंकरून कुटुंबापैकी कोणी एकाच्या मेहेनतीनें कांहीं इस्टेट संपादित असेल तर त्यास दुप्पट हिस्सा द्यावा अर्से ठरले आहे. . सदर्लंड्स विक्ली रि० वा० ६ दिवाणी मुकदमे पू० २१९ अ० नं० १३८ सन १८६६. ७५. भूलोकम् वि० स्वर्णम् ई० ला० रि० ४ म० ३३०. ७६. व्य० म० भा० २ रा पृ० १७८ व १७९; वारेमि० प० २२० पृ० २ पं० ११. २०