पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ • द्रव्य कोणचें ह्याविषयी पूर्वी बराच संशय घेण्यास कारण होते. मद्रास हायकोर्टाचा ठ- राव व्हा २५० ५६, चपलोंडा अळसानी वि० चकलोंडा रत्नचलम ह्यांत एका नायकि- णीनें दुसरीचें पालणपोषण केल्यावरून तिणें मिळविलले द्रव्य पोषण करणारीचें असे ठरविण्यांत आलें. नंतर मुंबई हा० को० रि०व्हा ०६ अपि० शा० पृ० १ ह्यांत बाई मनछा वि० नरोत्तमदास काशीदास ह्यांत असा ठराव झाला की, बाई मनछा हिचा नवरा वकील होता; त्यास कुटुंबांतील द्रव्यांतून विद्या शिकविली ह्मणून त्याचें द्रव्य स्वकष्टार्जित असें ह्मणतां येत नाहीं, सबब तें त्याच्या विधवेस मिळाले नाहीं. नंतर पाउलीयम वालचेट्टी वि० पाउलीयम सूर्यचेट्टी ह्या कामांत मद्रास हायकोर्टाने ( एक खेरीज करून बाकी सर्व जज्यांनी ) असा ठराव केला की, त्या कज्जांतील मिळकत अरुणाचलम शेटीची होती आणि त्यावरून असे दिसून आलें कीं, अरुणाचलम हा व्यापारी असून त्यास व्यापारा- करितां भांडवल बापाकडून मिळाले नव्हते आणि अरुणाचलम याचा शाळेतील विद्याभ्यास हा त्याच्या बापाने आपल्या स्वतःच्या इस्टेटींतून करविला होता. ती विद्या काय हे दा- खविलेलें नसून, त्याच्या शाळेचा खर्च त्याच्या बापाने आपल्या स्वकष्टार्जित इस्टेटींतून केला होता. प्रि० कौ० लानें असें ठरविलें कीं, मुलास बापाने शाळेत पाठविले होतें, एवढ्या- वरूनच पुढे त्याणें आपल्या कष्टानें व बुद्धिमत्तेनें जें सर्व मिळविलें तें समाईक द्रव्य आहे असे आह्मी ठरवूं शकत नाहीं, ह्मणून त्या द्रव्याविषयी त्याने केलेले मृत्युपत्र कायम करून अपील काढून टार्किलें. ह्या वरील ठरावांच्या आधारानें मुंबईच्या हायकोटीनें लक्ष्मण मयाराम वि० जमनाबाई दयाराम मयाराम ह्याची विधवा इं. ला. रि. मुं. व्हा. ६ पृ. २२५, ह्यांत असें ठरविले आहे कीं, वादी लक्ष्मण याचा बाप मयाराम हा ५० वर्षांपूर्वी धारवाड येथें कलेक्टर हपिसांत २० रुपयांवर जमादार होता. तो सन १८४६ साली ११ रु. दरमहाचें पेनशन घेऊन राहिला. त्याच्या पहिल्या बायकोचा पुत्र दयाराम हा रिस्पांडंट जमनाबाई हिचा नवरा होता. मयारामाच्या दुसऱ्या बायकोचा एक मुलगा अपिलेंट लक्ष्मण हा होता. सन १८४९ मध्ये मयारामानें आपला मुलगा मुंबईस मिस्तर लिजेट यांजकडे आणिला आणि पुढे त्याला सदर अदालतींत जागा मिळून १८९६ साली मुनसफी मिळून शेवटी तो फर्स्ट क्लास सबार्डिनेट जड्ज होऊन १८७५ त मरण पावला. ह्या कामांतील बाकी मुद्यांचे प्रयोजन नाहीं; परंतु कोर्टाने असे ठर- विलें कीं, दाव्यांतील मिळकत दयाराम यानें आपल्या चाकरीच्या पैशांतून मिळविली ह्मणून जरी लहान मुलगा असतां कुटुंबाच्या खर्चातून त्याला शाळेत घालून शिकविले ●