पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १५१ इस्टेटं वडिलार्जित होते व त्यावर त्या वेळी स्त्री गर्भार असून नंतर झालेल्या मुलाचा हक्क उत्पन्न होतो. ६ बापानें वडिलार्जितापैकी बक्षीस दिलेली वडिलार्जितच. ६७ ( १९३.) दक्षिण महाराष्ट्र देशांत कोणी मनुष्यानें आपला जीव देऊन इनाम मिळविल्यास त्यास रक्तइनाम अर्से ह्मणतात. असें इनाम संपादकांच्या वंशजांस मात्र मिळतें; इतर दायादांच्या संबंधानें तें अविभाज्य द्रव्य होय. ( १९४.) पुणे जिल्ह्यांत एकास मिळालेली सरकारी इनाम जमीन, ती त्याची स्वसंपादित जमीन असें ठरवून, त्याजबरोबर एकत्र राहणाऱ्या भावाचा तिजवर हक्क नाहीं, व तो विकण्यास मयताच्या मुलास अधिकार आहे असे मुंबईच्या हायकोर्टानें ठरविलें आहे." ( १९९.) परंपरागत भूमि जो कोणी हरण केलेली संपादन करितो त्यास तिचा चतुर्थांश देऊन बाकीची भूमी सर्वांनी संपादकासुद्धां यथाविभाग वांटून घ्यावी. ६९ 69 ( १९६.) दुसऱ्याच्या अन्नावर पोटाचा निर्वाह करून दुसऱ्यापासून जो विद्या प्राप्त करून घेतली, अशा विद्येवर मिळालेले जें धन, त्या धनास विद्याधन ह्मणावें. गूढ विषयांचें सर्भेत विवरण करून त्यापासून जें मिळाले तेही विद्याधन ह्मटलेले आहे. शिष्य व आचार्य, यांपासून जे परस्परांस मिळतें तें; व सभेत पूर्वपक्ष करून किंवा संदिग्ध प्रश्नाचा निर्णय किंवा वादांत जिंकून जे मिळालें तें विद्याधन होय. अशा धनाचा विभाग नाहीं. ( यासंबंधानें आतां धनुकधारीलाल वि० गणपतलाल ( वी० रि० व्हा १० पा० १२२ ) पौलियम वल्लू चेटी वि० पौलियम सूरि चेटी (ला० रि० इं० अ० व्हा० ४ पा० १०९) इं. ला० रि० म० व्हा० १ पा० २५२ ), आणि लक्ष्मण मयाराम शुक्ल वि० जमनाबाई कोम दयाराम इं० ला० रि० मुं० व्हा ६ पा० २२५. पहा. स्वकष्टार्जित अविभाज्य करून, ६६. रमण वि० वेंकट इं० ला० रि० ११ म० २४६. कलकत्त्यास ह्याविरुद्ध इं० ला० रि० ८ क० १३१ ह्यांत अभिप्राय आहे. ६७. नानोमी वि० मदनमोहन का० रि० १३ इं० अ० ५, ६८. स्पे० अ० नं० ३३२ सन १८६७, ता० १७ जुलई सन १८६७. ६९. मिता० मा० पृ० १८१ व्य० म० भा० पृ० ४२; वीरमि० प० २२०, पृ० २, पं० १४, परंतु याविषयीं एक उलट ठराव पहाण्यांत आला आहे तो असा:-कांहीं इनाम जमीन सरकारानें खालसा केली, ती पुढे कुटुंबांतील एका पुरुषानें मिळविली तर ती त्याची स्वसंपदित मिळकत होय; त्यावर इतरांचा इक चालणार नाहीं; म० स० अदालतीचे निवाडे सन १८४९ पृ० १०७ ता० १२ नवंबर स० १८४९. ७०. मिता० भा० पृ० १८२; व्य० म० मा०भा०२ पृ० १७७; वीरमि० प० २२० पृ० २ पं० ११०